Loksabha Election 2024 : शिंदे गटातील कोल्हापूरच्या दोन खासदारांचा उमेदवारीसाठी आटापिटा....

Shivsena Eknath shinde Group News : मतदारसंघामध्ये दोन्हीही विद्यमान खासदारांचा जनसंपर्क कमी असल्याची लोकांमध्ये भावना आहे. आघाडी सरकार आणि महायुतीचा कालावधी आणि कोरोना काळात दोघांचीही कामगारी असमानधारक असल्याची भावना मतदार व्यक्त करतात.
Dhairyasheel mane-Sanjay Mandlik
Dhairyasheel mane-Sanjay MandlikSarkarnama

Kolhapur News : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तिढा कायम आहे. विद्यमान खासदारांविषयी नाराजी असल्याचे सांगत शिवसेना व मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे तिकीट कापणार असल्याची चर्चा आहे. निवडून येईल त्यालाच संधी देणार असल्याचा फॉर्म्युला ठरल्यानंतर भाजपने अधिक सक्षम उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे उमेदवारीची शाश्वती नसतानाही विद्यमान खासदारांनी दबाव गट बनवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे प्रचारदौरे सुरू ठेवत माझी उमेदवारी निश्चित असल्याचे छातीठोकपणे सांगत असले तरी उमेदवारीची टांगती तलवार कायम आहे.

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी भाजपसोबत जाण्यास निर्णय घेतला. त्यानंतर हळूहळू खासदारांची पावलेही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पडली. भरघोस निधी आणि आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची अट घालून कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकणंगल्याचे विद्यमान खासदार धैर्यशील माने (dhairyasheel mane) हे शिंदे गटात गेले. शिंदे गट भाजपसोबत गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel mane-Sanjay Mandlik
Madha Loksabha Constituency : निंबाळकरांच्या विरोधात महाविकास आघाडी की सर्वसहमती?; पवारांच्या निर्णयाकडे माढ्याचे लक्ष...

विद्यमान खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात जाण्यापूर्वी त्यांचे भाषण चर्चेचे विषय ठरले होते. निष्ठावंत सैनिक हे चोवीस कॅरेट सोने तर शिंदे गटात गेलेले बेन्टेक्स आहेत, अशी टीका केली होती. मात्र, भाषांणाच्या चौथ्याच दिवशी खासदार मंडलिक शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्याबद्दल चांगलेच चिडून आहेत. शिवाय मतदारसंघामध्ये दोन्हीही विद्यमान खासदारांचा जनसंपर्क कमी असल्याची लोकांमध्ये भावना आहे. आघाडी सरकार आणि महायुतीचा कालावधी आणि कोरोना काळात दोघांचीही कामगिरी असमानधारक असल्याची भावना मतदार व्यक्त करतात. शिवाय पाच वर्षांत विशेष कार्यक्रमही ते मतदारसंघात घेऊ शकलेले नाहीत. सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीच यंत्रणा राबवली नसल्याचे चित्र आहे.

Dhairyasheel mane-Sanjay Mandlik
Ranjeetsingh Naik Nimbalkar : दिग्गजांचा पत्ता कट करून दिल्लीचे तिकीट दुसऱ्यांदा मिळविणारे रणजितसिंह निंबाळकर

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीमुळे दोन्हीही विद्यमान खासदारांना त्याचा फायदा झाला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेने संजय मंडलिक यांच्या विजयात भर घातली, हे कोणी नाकारू शकत नाही. काँग्रेसच्या पाठबळामुळेच संजय मंडलिक यांना संसदेत जाण्याची संधी मिळाली, अशीही लोकभावना व्यक्त करतात. ही सर्व परिस्थिती असताना आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी द्यावी का? शिवाय मतदारसंघात असलेल्या अकार्यक्षमतेच्या ठपक्यामुळे दोन्ही खासदारांची प्रतिमा काहींशी मलिन झाली आहे. शिवाय, महायुतीचा जिल्ह्यातील एकही आमदार या दोघांच्या उमेदवारीबाबत बाजू घेण्यास तयार नाही. कोल्हापूरच्या जागेबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांनी खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

कोल्हापुरातील दोन्हीही खासदारांचे पत्ते कापण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. कोल्हापूरच्या जागेवर उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू असून, भाजपचे नेते समरजित घाटगे यांचे नाव निश्चित झाले असून, त्यांना शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी देणार असल्याचे बोलले जाते. हातकणंगलेबाबत सस्पेन्स कायम आहे. अशा परिस्थितीत विद्यमान खासदारांनी दबाव वाढवण्यासाठी वेगवेगळे पर्याय स्वीकारले आहेत. हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी प्रचाराला सुरुवात करून गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

Dhairyasheel mane-Sanjay Mandlik
Samadhan Autade News : भाजप आमदार समाधान आवताडेंचे डोळे का पाणावले?

खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणून घेतली. त्यानंतरही त्यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे छातीठोकपणे सांगितले. मात्र, मागील दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारीबाबत कल्पना दिली असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे उमेदवारी न मिळण्याचे संकेत त्यांना मिळाले, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, दबाव गट निर्माण करण्यासाठी त्यांनी कोअर कमिटीतील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन रणांगणात मीच असणार, असे जाहीर केले आहे. तसेच खासदार मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीचे स्वतः मंडलिक यांनी खंडन केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना डावलून परस्पर अमित शाह यांना भेटल्याने शिंदे हे त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते, अशी चर्चा रंगली आहे.

एकंदरीतच दोन्हीही विद्यमान खासदारांना आपल्या उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम आहे. उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडण्यासाठी दोन्ही खासदारांनी धडपड सुरू आहे. येत्या चार ते पाच दिवसांत नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार, हेच स्पष्ट होणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Dhairyasheel mane-Sanjay Mandlik
Madha Lok Sabha News : रामराजे-मोहिते पाटील विसरा; जयकुमार गोरेंच्या हाती माढ्याचा कासरा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com