Dhairyasheel Mane
Dhairyasheel Mane Sarkarnama

Hatkanangle Constituency: हातकणंगलेत धैर्यशील मानेंची पुन्हा एकदा मुसंडी

Hatkanangle Lok Sabha Election Result 2024 Live: Satyajit Patil Sarudkar Vs Dhairyasheel Mane: 18 व्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या सत्यजित पाटील सरूडकर यांना धैर्यशील माने यांनी पिछाडीवर टाकलं आहे.
Published on

Hatkanangle Lok Sabha Election Result 2024 Live: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी अखेर मतमोजणीत आघाडी घेतली आहे. 18 व्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या सत्यजित पाटील सरूडकर यांना पिछाडीवर टाकत धैर्यशील माने 2113 मतांची आघाडी घेतली आहे.

हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यात चुरशीची लढत पाहाया मिळत आहे. 18 फेरीपर्यंत सत्यजित पाटील सरूडकर हे आघाडीवर जात असल्याचे चित्र होते. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांचं टेन्शन वाढलं होतं.

मात्र, आता हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. त्यामुळे आता पुन्हा मतमोजणीत महाविकास आणि महायुतीमध्ये प्रचंड चढाओढ निर्माण झाल्याचं दिसत आहे. 18 व्या फेरीनंतर धैर्यशील माने 2113 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता नेमका विजय कोणाचा होणार याची उत्सुकता उमेदवारांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.

Dhairyasheel Mane
Udayanraje Win In Satara Loksabha : कॉलरची शान वाढली; साताऱ्यात बाजी पलटली, उदयनराजेंनी मैदान मारलं

या मतदारसंघात आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर तर, महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात होते. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या लढतीमुळे या मतदारसंघातील निवडणूक तिरंगी बनली होती. परंतु, सध्या पाटील आणि माने हे दोघामध्ये चढाओढ सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com