Kolhapur Constituency Lok Sabha Election 2024: शाहू महाराज छत्रपती 12000 मतांनी आघाडीवर

Kolhapur Lok Sabha 2024 Results LIVE Updates: विद्यमान आमदार आणि माजी आमदार महायुतीत असताना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत सर्वाधिक मताधिक्य देणारा तालुका हा राधानगरी ठरला आहे.
Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandlik , Hasan Mushrif, Samarjit Ghatge, KP Patil
Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandlik , Hasan Mushrif, Samarjit Ghatge, KP PatilSarkarnama
Published on
Updated on

Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandalik : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल काही तासांनंतर स्पष्ट होईल. मात्र, आतापर्यंत मतमोजणीच्या दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. दुसऱ्या फेरीअखेर शाहू महाराज छत्रपती हे जवळपास 12 हजार मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि राधानगरी मतदारसंघात शाहू महाराज यांची मुसंडी कायम आहे.

तर महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) हे त्यांच्याच होमपीचवर कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात सुसाट आहेत. राधानगरीमधून शाहू महाराज छत्रपती यांना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत अनुक्रमे अडीच हजार ते साडेतीन हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. या विधानसभा मतदारसंघात शिवसेने शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे संजय मंडलिक यांच्या प्रचारात होते.

मात्र शाहू महाराज (Shahu Maharaj Chhatrapati) आणि राधानगरी यांचे जिव्हाळ्याचे संबंध दुसऱ्या फेरीपर्यंत तरी राधानगरीकरांनी दाखवून दिले आहेत. तर कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात खासदार संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळताना दिसत आहे. महायुतीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ शाहू ग्रुपचे अध्यक्ष भाजपचे नेते समरजीत घाटगे यांची पकड या मतदारसंघावर दिसत आहे.

के.पी पाटलांनी डाव उलटवला?

राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी पाटील यांच्यात विधानसभेची पारंपारिक लढत होते.

कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोघे एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकत असतात. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार के. पी पाटील काय भूमिका घेतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandlik , Hasan Mushrif, Samarjit Ghatge, KP Patil
Hatkangle constituency 2024 : हातकणंगलेत धैर्यशील मानेंचं टेन्शन वाढलं, तिसऱ्या फेरीत सत्यजित पाटलांची मुसंडी

विद्यमान आमदार आणि माजी आमदार महायुतीत असताना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत सर्वाधिक मताधिक्य देणारा तालुका हा राधानगरी ठरला आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीअखेर तरी शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर आहेत. त्यामुळे हळूहळू निकाल स्पष्ट होईल. पण फेरीत मताधिक्य मिळत गेल्यास, माजी आमदार के. पी पाटील यांनी घेतलेली भूमिका काय होती. हे निकालानंतर स्पष्ट होईल.

कोल्हापूर लोकसभा मतमोजणी पहिली फेरी

चंदगड : 162 मतांनी शाहू महाराज आघाडीवर

राधानगरी : 2016 मतांनी शाहू महाराज आघाडीवर

कागल : 848 मतांनी संजय मंडलिक आघाडीवर

दक्षिण : 1036 मतांनी शाहू महाराज आघाडीवर

करवीर : 730 मतांनी शाहू महाराज आघाडीवर

उत्तर : 3241 मतांनी शाहू महाराज आघाडीवर

एकूण 6337 मतांनी शाहू छत्रपती पहिल्या फेरीत आघाडीवर

Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandlik , Hasan Mushrif, Samarjit Ghatge, KP Patil
Sangli Lok Sabha Election 2024 Result: शतरंज के खिलाडी - सांगलीच्या बुद्धीबळपटावर विशाल पाटलांचा ताबा

कोल्हापूर लोकसभा मतमोजणी दुसरी फेरी

चंदगड : 718 मतांनी शाहू महाराज आघाडीवर

राधानगरी : 2136 मतांनी शाहू महाराज मतांनी आघाडीवर

कागल : 1870 मतांनी संजय मंडलिक आघाडीवर

दक्षिण : 250 मतांनी संजय मंडलिक आघाडीवर

करवीर : 2425 मतांनी शाहू महाराज आघाडीवर

उत्तर : 2315 मतांनी शाहू महाराज आघाडीवर

दुसऱ्या फेरी अखेर शाहू महाराज 11811 मताने आघाडीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com