Lok Sabha Election : सांगलीचा विषय संपला, ठाकरे गटाचा मैत्रीपूर्ण लढतीला विरोधच; दिल्लीत निर्णय काय?

Congress Vs Shivsena UBT : सांगलीवरून काँग्रेस-सेना यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे. दिल्ली दरबारीसुध्दा सांगलीचा वाद मिटलेला नाही.
Congress, Shivsena UBT
Congress, Shivsena UBT Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत शिवसेना व काँग्रेसमधील वाद रविवारी दिल्लीतील बैठकीतही कायम राहिला. काँग्रेस-शिवेसना नेत्यांनी जागा आपल्यालाच मिळावी, यावर हक्क सांगितला. दोघांनीही विषय ताणल्याने चर्चेमध्ये खडाजंगी झाली. मात्र सांगलीचा विषय संपला, असे सांगत शिवसेनेने मैत्रीपूर्ण लढतीला ठाम विरोध दर्शविला. त्यामुळे 3 एप्रिलला महाविकास आघाडीची एकत्रित उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये सांगलीची घोषणा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात सांगली लोकसभेचा विषय पुन्हा गाजला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या जागांबाबत सविस्तर चर्चा झाली. सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असताना सेनेने परस्पर उमेदवार जाहीर केल्याचा आरोप होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress, Shivsena UBT
Mahadev Jankar : परभणीत महायुतीचा उपरा उमेदवार? जानकरांचंही सडेतोड उत्तर; म्हणाले...

सांगलीवरून काँग्रेस-सेना यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे. दिल्ली दरबारीसुध्दा सांगलीचा वाद मिटलेला नाही. सांगलीबाबत काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. मात्र दोन्ही बाजुनी सांगलीवर आपलाच हक्क सांगण्यात आला. या बैठकीत काँग्रेसच्यावतीने पक्षाचे अध्यक्ष खर्गे यांनी सांगलीच्या जागेबाबत आग्रह धरला. वर्षभरापासून काँग्रेसने तयारी केली आहे. त्यामुळे आम्हांला जागा देण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही सांगली सोडण्याबाबत असमर्थता दाखवली.

सांगलीचा विषय संपलेला आहे. तेथे मैत्रीपूर्ण लढतीला ठाम विरोध असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट बजावले. इतरही काही मुद्यांवर चर्चा झाली मात्र मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे दिल्लीतील बैठकीतही सांगलीच्या जागेचा तिढा कायम राहिल्याचे स्पष्ट झाले. आता महाविकास आघाडीच्यावतीने 3 एप्रिलला मुंबईत बैठक होणार आहे. त्यावेळी महाविकास आघाडीची उमेदवारी यादी एकत्रित जाहीर केली जाणार आहे. त्या बैठकीत सांगलीबाबत पुन्हा चर्चा होणार आहे. तोपर्यंत अन्य काही मार्गाबाबत पडताळणी करण्यात येणार आहे.

Congress, Shivsena UBT
Sanjay Shirsat News : संजय शिरसाटांनी महाजनांना शेलक्या शब्दात सुनावले; म्हणाले, 'शेपटीला चिंधी बांधून...'

दरम्यान, शिवसेनेला मुंबई परिसरातही अधिक जागा हव्या आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने एक पाऊल मागे टाकले तर सेनेची सांगलीबाबत भूमिका बदलेल काय, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्यास बळ देत पश्चिम महाराष्ट्रात सेनेला स्थान देऊन सांगलीवरील सेनेची पकड सोडवून घेतली जाईल, या पातळीवरही चर्चा सुरु आहे.

दिल्लीतून भूमिकेवर विशाल पाटलांचा फैसला

सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे, त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही प्रयत्न केले, परंतु उद्धव ठाकरे हट्ट सोडायला तयार नाहीत. या कारणांनी निर्णय गुलदस्त्यातच राहिला. पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आता दिल्लीश्वराच्या भूमिकेवर विशाल पाटील यांचा फैसला होण्याची शक्यता दिसते.

(Edited by Sunil Dhumal)

Congress, Shivsena UBT
Nashik Lok Sabha Constituency : शिंदे गट इरेला पेटला! नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शेवटपर्यंत लढणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com