Loksabha Election 2024 : सातारा राष्ट्रवादीचाच; निवडणुकीच्या प्रस्तावावर विचार करू...पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan आज पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली बाजू मांडताना सातारा लोकसभा मतदारसंघ हा महाविकासच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे गेला आहे.
Prithviraj Chavan, Sharad pawar
Prithviraj Chavan, Sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आज चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असून, त्यांनी तुतारीबाबत निर्णय घ्यावा. काँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भात काल कराडला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केली होती. त्यानंतर चर्चेला उधाण येऊन साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली.

यावर आज पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली बाजू मांडली. काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक बाबींचा उल्लेख केला. ते म्हणाले, सातारा लोकसभा मतदासंघ हा महाविकासच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे गेला आहे. महाविकास आघाडीच्या ४८ पैकी जवळ जवळ सर्व जागांवर एकमत झालं आहे. सातारा मतदारसंघात उमेदवार कोण असावा, याबद्दल चर्चा सुरू आहे. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे. यासंदर्भात माझी जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली आहे.

Prithviraj Chavan, Sharad pawar
Satara Loksabha 2024 : भाजपला रोखण्यासाठी साताऱ्यात पवारांनी टाकला डाव; जयंत पाटील-पृथ्वीराज चव्हाणांमध्ये खलबत्तं

आता कोणता उमेदवार द्यायचा हा निर्णय सर्वस्वी शरद पवार Sharad Pawar यांनी घ्यायचा आहे. ते जो उमेदवार देतील त्यांचे आम्ही पूर्ण ताकतीने काम करून त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी राहू, असं त्यांनी सांगितलं. या मतदारसंघातील तुतारीचा विषय असून, तुतारीचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. साताऱ्यात आम्हाला जातीयवादी लोकप्रतिनिधी नको आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा लोकसभा काँग्रेसने लढवावी म्हणून अजून तरी प्रस्ताव आलेला नाही. जर आला तर त्या प्रस्तावाचा विचार करू, असे त्यांनी स्पष्ट करत लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. त्यावर ते म्हणाले, हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. उमेदवारीच्या जर तरच्या प्रश्नावर मी बोलणार नाही.

Edited By : Umesh Bambare

R

Prithviraj Chavan, Sharad pawar
Satara Loksabha Election 2024 : अजित पवार सोडणार का बालेकिल्ल्यावरील हक्क..? साताऱ्याचा आज फैसला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com