Ratnagiri Sindhudurg Loksabha : ''अडीच लाखांच्या फरकाने आपटणार'' विनायक राऊतांचे नारायण राणेंना चॅलेंज

Loksabha Election 2024 : नारायण राणे यांना सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावे लागणार. कोकणातून महाविकास आघाडीचे सर्व उमेवार विजयी होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
Kiran Samant, Narayan Rane, Vinayak Raut
Kiran Samant, Narayan Rane, Vinayak Rautsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News : महाविकास आघाडीकडून रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून विनायक राऊत हे उमेदरवार असणार आहेत. महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी नारायण राणे हे येथून निवडणूक लढणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या उमेदवारीची विनायक राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. नारायण राणे यांना तिसऱ्यांदा चितपट करण्याची संधी मिळणे मी भाग्य समजतो, असे राऊत म्हणाले.

Kiran Samant, Narayan Rane, Vinayak Raut
Baramati Politics : हर्षवर्धन पाटलांचा अजितदादांवर भरोसा नाय का? थेट फडणवीसांनाच घातलं साकडं, म्हणाले...

नारायण राणे (Narayan rane) यांना आपण आव्हान मानत नाही. त्यांच्यापेक्षा किरण सामंत हे उमेदवार असते तर ते माझ्यासाठी आव्हानात्मक असते. विरोधक म्हणून कोणीही येऊ दे ते कमीत कमी अडीच लाखांच्या फरकाने अपटणार, असा टोला राणे यांचे नाव न घेता राऊत (Vinayak Raut)यांनी लगावला.

नारायण राणे यांना सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावे लागणार. कोकणातून महाविकास आघाडीचे सर्व उमेवार विजयी होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तसेच राणे यांची उमेदवारी अजुनही जाहीर न झाल्याने महायुतीचा उमेदवार 12 तारखेपर्यंत ठरला तरी पुष्कळ आहे, असा टोला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटाचा दावा कायम

नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे. किरण सामंत यांनी आपला दावा मागे घेत असल्याची सोशलमीडिया पोस्ट केली होती मात्र नंतर ती डिलीट केली. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघावर दाव कायम असल्याचे म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com