Madan Bhosale : बँकेची तब्बल 61.15 कोटींची फसवणूक, भाजप नेते मदन भोसलेंच्या अडचणी वाढणार

Madan Bhosale Kisan Veer Sugar Factory : किसन वीर कारखान्यास विस्तारीकरण करण्यासाठी बँक ऑफ इंडियाने पन्नास कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. 2010 सालापासून कारखान्याचे आणि बँकेचे चांगले व्यवहारिक संबंध होते.
Madan Bhosale Kisan
Madan Bhosale KisanSarkarnama
Published on
Updated on

Madan Bhosale News: किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कर्ज मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे व माहिती देऊन बँक ऑफ इंडियाची 61 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे नेते, कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत बजरंग इंगवले, कार्यकारी संचालक अशोक भार्गव जाधव व इतर यांच्या विरोधात बँकेने सीबीआयकडे तक्रार केली आहे. यानुसार पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास विस्तारीकरण करण्यासाठी बँक ऑफ इंडियाने पन्नास कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. 2010 सालापासून कारखान्याचे आणि बँकेचे चांगले व्यवहारिक संबंध होते.

त्यामुळे बँकेने एवढी मोठी रक्कम कर्ज स्वरूपात कारखान्याला मंजूर केली. ही रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या करंट खात्यावर वळविण्यात आली. यावेळी बँकेने एक कोटी ७० लाख ४३१ रुपये ३८ पैसे व्याज खात्यामध्ये जमा करून घेऊन ही रक्कम कारखान्याला दिली होती. त्यानंतर ही रक्कम कारखान्याकडून थकीत झाली.

दरम्यान कारखान्याने डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडून कारखान्याच्या डिस्टिलरी उभारणीसाठी 'बँक ऑफ इंडिया' ला दिलेली मालमत्ता तारण देऊन बँकेची Bank फसवणूक केली. कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे खोटी आर्थिक विवरणपत्रे व कागदपत्रे सादर केली व बँकेच्या सुविधांचा गैरविनियोग केला,असे तक्रारीत म्हटले आहे.

Madan Bhosale Kisan
Narendra Patil : नरेंद्र पाटील संतापले; थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारणार जाब! काय आहे कारण?

सदरचे कर्ज प्रकरण थकबाकीत गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे बँक ऑफ इंडियाचे पुणे विभागीय व्यवस्थापक (वसुली) अनिल कुमार श्रीवास्तव यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सीबीआय (नवी दिल्ली) यांच्याकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर 24 मे 2024 रोजी पुणे येथील पोलfस आयुक्तालयात सदर गुन्हा दाखल करण्यात आला . आर्थिक गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त ( नवी दिल्ली) मनीष हिरालाल नवलाखे अधिक तपास करत आहेत.

एक रुपयाचाही गैर व्यवहार नाही

किसन वीर कारखान्याच्या कामकाजासाठी कर्ज घेतले होते, ही वस्तुस्थिती आहे. त्याचा विनियोग ही कारखान्याच्या कामासाठी करण्यात आला आहे. कदाचित त्यातील काही रकमेची परतफेड करण्याची राहून गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यातील एक रुपयाचाही गैर व्यवहार झालेला नाही. एफआयआरमध्ये नेमकेपणाने काय दाखल झाले आहे, याचा तपशील न मिळाल्याने अधिक भाष्य करणे उचित होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते, किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली आहे.

Madan Bhosale Kisan
Prithviraj Chavan on Election Commission: पृथ्वीराज चव्हाण यांचे थेट निवडणूक आयोगाला आव्हान; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com