Shaktipith Mahamarg : CM फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला महायुतीतूनच विरोध : तिन्ही पक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत विरोधी ठराव समंत

Shaktipith Mahamarg opposition resolution : महायुतीची सत्ता असतानाही जिल्हा परिषदेत शक्तिपीठ महामार्गाविरोधी ठरावाला भाजपने पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या राजकारणातील या महत्त्वाच्या घडामोडीची सविस्तर माहिती वाचा.
Mahayuti leaders oppose Shaktipith Mahamarg
Mahayuti leaders oppose Shaktipith MahamargSarkarnama
Published on
Updated on

Shaktipith Mahamarg district council decision: राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून देखील विरोध होत आहे. अशातच महायुतीची सत्ता असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत देखील शक्तिपीठ विरोधी महामार्गाला विरोध करणारा ठराव काँग्रेसकडून मांडण्यात आला.

आश्चर्याची बाब म्हणजे महायुतीतील सर्व सदस्यांनी तसेच भाजपच्या काही सदस्यांनी या विरोधी ठरावाला पाठिंबा दिला. भाजपच्या सदस्यांनीही या ठरावाला विरोध न करता पाठिंबा दिल्याने हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

Mahayuti leaders oppose Shaktipith Mahamarg
Kalpana Kharat : खरातच्या बायकोची सुटका नाहीच ; एका गुन्ह्यात जामीन पण दुसऱ्यात अटकेची टांगती तलवार कायम

जवळपास पाच वर्षानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक झाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. पहिल्याच सर्वसाधारण सभेत काँग्रेस कडून शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणारा ठराव मांडण्यात आला.

काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणारा ठराव मांडला. या ठरावाला सभागृहातील विविध पक्षांच्या सदस्यांनी समर्थन दिले आणि अखेर तो मंजूर करण्यात आला.

ठरावावर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पोवार यांनी वेगळी भूमिका मांडली. शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून भाजपच्या १२ जिल्हा परिषद सदस्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा असेल, असे त्यांनी सभागृहात सांगितले. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे यांनी तात्काळ भूमिका स्पष्ट करत, "आमचाही शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. तुमचे मत वैयक्तिक असू शकते, पण आम्ही या प्रकल्पाला विरोधच करणार," असे स्पष्टपणे सांगितले.

Mahayuti leaders oppose Shaktipith Mahamarg
Mayank Lohar Murder Case : माझ्या मुलाचा मारेकरी पुन्हा जीव घेईल… त्याचा एन्काऊंटर करा! मयंक लोहारच्या वडिलांची एकनाथ शिंदेंकडे थेट मागणी

त्यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात काही काळ चर्चा रंगली. यानंतर तानाजी पोवार यांनीही आपली भूमिका मवाळ घेत, "१२ सदस्यांचे मत वेगळे असले तरी आम्ही शक्तिपीठविरोधी ठरावाला मंजुरी देत आहोत," असे सांगितले. त्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

महायुतीची सत्ता असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेतच शक्तिपीठ महामार्गाविरोधात ठराव मंजूर झाल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः भाजपच्या सदस्यांनीही विरोधाची भूमिका घेतल्याने स्थानिक पातळीवरील जनभावना आणि पक्षीय भूमिकेत फरक असल्याचे चित्र समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com