Mayank Lohar Murder Case : माझ्या मुलाचा मारेकरी पुन्हा जीव घेईल… त्याचा एन्काऊंटर करा! मयंक लोहारच्या वडिलांची एकनाथ शिंदेंकडे थेट मागणी

Mayank Lohar father demands encounter: लोकल ट्रेनमधील क्षुल्लक वादातून मयंक लोहारची निर्घृण हत्येनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयंकच्या वडिलांशी फोन करून संवाद साधत सरकार पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
Father seeks strict punishment in Mayank Lohar case
Father seeks strict punishment in Mayank Lohar caseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Local Train Murder : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या धक्कादायक हत्याकांडानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून मृत मयंक लोहार याच्या कुटुंबियांचा आक्रोश थांबण्याचे नाव घेत नाही.

मुलाच्या निर्घृण हत्येनंतर वडिलांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी केल्याने हे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे.

घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मयंकच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधत सरकार संपूर्ण ताकदीने कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासनही शिंदेंनी दिले.

यावेळी संतप्त वडिलांनी अत्यंत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले की, केवळ ट्रेनचा दरवाजा बंद केल्याच्या कारणावरून माझ्या मुलाचा जीव घेतला. असा माणूस बाहेर आला तर पुन्हा कुणाचा तरी जीव घेईल. त्याला फाशी द्या किंवा एन्काऊंटर करा. त्यांच्या या मागणीमुळे प्रकरणाला नवा राजकीय आणि सामाजिक आयाम मिळाला आहे.

Father seeks strict punishment in Mayank Lohar case
Shrirampur councillor firing case : वाळू माफियांचा थरार! ‘मकोका’तील फरार नगरसेवकाचा शेतकऱ्यावर गोळीबार; “नीलेश शेंडगेसारखा संपवतो” धमकी

ही धक्कादायक घटना मुंबई (Mumbai) लोकलमध्ये घडली. लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून रोशन सुवर्ण आणि मयंक लोहार यांच्यात वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की रोशनने थेट चाकूने मयंकवर हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा यात मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेतील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, ट्रेनमध्ये शेकडो प्रवासी उपस्थित असतानाही मयंकला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. यामुळे मयंकच्या आई-वडिलांनी संताप व्यक्त करत समाजातील वाढती असंवेदनशीलता अधोरेखित केली.

Father seeks strict punishment in Mayank Lohar case
Shiv Sena Leader Attack : रॉड, दांडके, पिस्तुल अन् गँगवॉरचा अँगल? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या युवा नेत्यावर गोळीबारात नगरसेवकासह नऊ जणांविरोधात गुन्हा

400 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

दरम्यान हत्या केल्यानंतर आरोपी रोशन सुवर्ण मुंबई सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र मुंबई पोलिस यांनी वेगाने तपास करत त्याला अटक केली. विशेष म्हणजे, या तपासात तब्बल 400 सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या टी-शर्टवरील कंपनीचा लोगो पोलिसांसाठी सर्वात मोठा क्लू ठरला.

निर्णायक पुरावा, टी-शर्टवरील लोगो

सुरुवातीला आरोपीची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. चर्चगेट ते नालासोपारा या संपूर्ण मार्गावरील स्थानकांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचवेळी काही प्रवाशांनी काढलेले व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले. त्या व्हिडिओत आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत होता; पण निर्णायक पुरावा ठरला तो त्याच्या टी-शर्टवरील लोगो.

पोलिसांचा कार्गो कंपनीतपर्यंत तपास

पोलिसांनी संबंधित कार्गो कंपनीपर्यंत तपास पोहोचवत कर्मचाऱ्यांची माहिती पडताळली आणि अखेर आरोपी रोशन सुवर्णची ओळख निश्चित केली. माहिती अशीही समोर आली आहे की, घटनेच्या वेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. तो मीरा रोडच्या साईबाबानगर परिसरात कुटुंबासह राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणामुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एका क्षुल्लक वादातून गेलेला तरुणाचा जीव आणि त्यानंतर कुटुंबाचा हंबरडा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com