Shivrajsingh Chouhan News : शिवराजसिंह चौहानांना कोल्हापुरी पायताणाची भुरळ, अंबाबाईचे दर्शन घेऊन दुकानात शिरले...

Kolhapur Tour : शिवराजसिंह चौहान यांनी विक्रेत्यांशी संवाद साधत कोल्हापुरी पायताणाची वैशिष्ट्ये जाणून घेतली.
Shivrajsinh Chauhan
Shivrajsinh Chauhan Sarkarnama

Kolhapur News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान आज (ता. २४ फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून झंझावती दौरे सुरू आहेत. त्या अंतर्गतच चौहान कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना कोल्हापुरी पायताणाची भुरळ पडली. एकीकडे लोकसभेच्या निमित्ताने मतदारसंघ पिंजून काढत असताना चौहान यांना आपल्या आवडीचा मोहही आवरता आला नाही. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी थेट पायताण ओळीला गाडी नेत कोल्हापुरी पायताण खरेदी केले. (Loksabha Election 2024)

शिवराजसिंह चौहान यांनी विक्रेत्यांशी संवाद साधत कोल्हापुरी पायताणाची वैशिष्ट्ये जाणून घेतली. राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक या वेळी त्यांच्यासोबत होते. कोल्हापुरी पायताणाची एक वेगळी ओळख जगभरात आहे. कुर्ता आणि पायजमा यावर पायताण घातले नाही, तर तो पोशाख अपूर्ण वाटतो, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. (kolhapur Tour)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivrajsinh Chauhan
Solapur Politics : शहाजीबापू अन्‌ आवताडेंना सावंतांचा सूचक इशारा; बाबासाहेब देशमुख, भालकेंचे केले कौतुक!

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपने सर्वच पातळीवर तयारी सुरू केली आहे. बूथ कार्यकर्त्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वच यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवराज चौहान यांचा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. (BJP News)

शिवराजसिंह चौहान यांचे शनिवारी सकाळपासून कोल्हापुरात विविध कार्यक्रम होत आहेत. सकाळी सात वाजता त्यांचे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर भाजप नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेत आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. बिंदू चौक, सब जेलजवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी चाय पे चर्चा केली.

Shivrajsinh Chauhan
Dharashiv Loksabha Constituency : प्रवीणसिंह परदेशी धाराशिव लोकसभा लढवणार ? स्वत:च केला मोठा खुलासा

दरम्यान, आज दुपारी एक वाजता चौहान यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघअंतर्गत कार्यकर्त्यांची बैठक आणि मेळावा महासैनिक दरबार येथे पार पडणार आहे. दुपारी दोन वाजता हातकणंगले लोकसभा मतदारसंघअंतर्गत कार्यकर्त्यांची बैठक आणि मेळावा शिरोली येथे पार पडणार आहे.

Edited By : Vijay dudhale

R

Shivrajsinh Chauhan
Maratha Reservation : '...त्यामुळे मराठा समाजाने स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले आहे'; चंद्रकांतदादांना पंढरपुरात घेराव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com