Farmer's Loan: कोर्टाच्या दणक्यानंतर शासनाला आली जाग! 2017 मधील प्रलंबित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निधी वितरित

Farmer's Loan Waiver: सततचा दुष्काळ व नापिकीमुळं कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ जाहीर केली होती.
Farm Loan Waiver Update
Farm Loan Waiver Updatesarkarnama
Published on
Updated on

Farmer's Loan: सततचा दुष्काळ व नापिकीमुळं कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ जाहीर केली होती. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या ५०.६० लाख पात्र खात्यांपैकी ८७ टक्के खातेधारकांना निधी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित १३ टक्के लाभार्थ्यांचा निधी वितरित करण्यात आला नव्हता. पण कोर्टानं दणका दिल्यानंतर आता या उर्वरित शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी शासनानं तातडीनं ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. उर्वरित किती शेतकऱ्यांना किती रुपयांचा निधी वितरित होणार आहे? जाणून घेऊयात.

Farm Loan Waiver Update
Zirwal News : वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणानंतर मंत्री झिरवळ यांचा सुनेत्रा पवारांना फोन; आपला कुठलाही दोष नसल्याचं केलं स्पष्ट

शासन निर्णयात नेमकं काय म्हटलंय?

सन २०१७ मध्ये आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. या योजनेंतर्गत ५०.६० लाख पात्र लाभार्थी शेतकरी होते. यांपैकी ४४.०४ लाख खातेदारांना लाभ देण्यात आला होता. पण ६.५६ लाख शेतकरी या लाभापासून वंचित होते. वारंवार सरकार दरबारी खेटे घालूनही त्यांना हक्काचा निधी उपलब्ध होत नसल्यानं या शेतकऱ्यांनी थेट कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, काही शेतकऱ्यांनी आणि सहकारी संस्थांनी हायकोर्टाच्या मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांची दखल घेत हायकोर्टानं याचिकार्ते शेतकरी तसंच उर्वरित पात्र लाभार्थ्यांना तातडीनं निधी देण्याचे आदेश राज्य शासनाला दिले.

Farm Loan Waiver Update
Sangamner Acid Attack : सहावीतील मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; विधिमंडळात संतापाचा स्फोट! पटोले कडाडले, कायंदे गरजल्या तर, विखे म्हणाले...

गेल्या हिवाळी अधिवेशनात होता प्रस्ताव

यासाठी ५९७५.५१ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव डिसेंबर २०२५ मध्ये हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला होता. या एकूण निधीपैकी सध्या ५०० कोटी रुपयांचा निधी शासनानं उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळं आता लवकरच ज्या शेतकऱ्यांना २०१७ च्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता त्यांच्या खात्यात रक्कम केली जाणार आहे. पण यासाठी ग्रीन लिस्टनुसार पात्र असणाऱ्या कर्जखात्यांनाच लाभ दिला जाईल याची दक्षता सहकार आयुक्तालयानं घ्यावी असं शासनानं काढलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे.

Farm Loan Waiver Update
Sharad Pawar-Sanjay Raut : तयारी सुरू, या माणसाची खरंच कमाल आहे! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे सूचक विधान...

आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ

दरम्यान, नागपूर, वर्धा, बुलडाणा, धुळे-नंदुरबार, जालना, नाशिक, धाराशिव, नांदेड या आठ जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये ज्या लाभार्थी शेतकऱ्यांची एकूण ६६,७५६ कर्जखाती आहेत. या खात्यांसाठी ४६४ कोटी ९३ लाख ३९ हजार रुपयांची वितरित करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com