Wai News : मकरंद पाटलांनी अजितदादा गटात जावे : मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मागणी

Makrand Patil राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
Sharad Pawar, Makrand Patil, Ajit Pawar
Sharad Pawar, Makrand Patil, Ajit Pawarsarkarnama
Published on: 
Updated on: 

-भद्रेश भाटे

Wai NCP News : आमदार मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील व्हावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच किसन वीर साखर कारखान्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या हितासाठी आमदार पाटील यांनी हा निर्णय घ्यावा, असा ठराव करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये NCP फूट पडल्यानंतर आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी होती. त्याचे पडसाद समाज माध्यमातून दिसत होते.

वाई येथील बाजार समितीच्या सभागृहात काल रात्री वाई, खंडाळा व महाबळेश्‍वर या तीन तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार पाटील यांनी अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय का घ्यावा, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आजवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मदत केली असून, भविष्यातही अशाप्रकारे शासनस्तरावर मदत मिळावी. ‘किसन वीर’च्या भुईंज व खंडाळा येथील कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी व शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मदत मिळावी, यासाठी अजित पवार यांच्या गटात सामील होणे हिताचे असल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी मांडले.

Sharad Pawar, Makrand Patil, Ajit Pawar
Rohit Pawar : ...म्हणून आमदारांना बसमध्ये बसवून हॉटेलमध्ये ठेवलं | NCP | Ajit Pawar | Sharad Pawar

कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती आमदार मकरंद पाटील यांना देण्यात आली आहे. यावेळी वाई तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, अफजल सुतार, नारायण बिरामणे, शेखर कासुर्डे, नितीन भरगुडे-पाटील, दत्तानाना ढमाळ, शामराव गाढवे, मनोज पवार, उदय कबुले, राजेंद्र तांबे, अजय भोसले, रफिक मुजावर, शशिकांत पिसाळ

तसेच रमेश गायकवाड, दासबाबू गायकवाड, संजय लोळे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, भूषण गायकवाड, नगरसेवक चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, प्रदीप जायगुडे, संदीप नायकवडी, धनंजय हगीर, भारत खामकर, डी. बी. खरात, कारखान्याचे सर्व संचालक, बाजार समितीचे संचालक, नगरसेवक, मदन भोसले, शंकर शिंदे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharad Pawar, Makrand Patil, Ajit Pawar
Eknath Shinde सोबत बसून Devendra Fadnavisनी काय सिद्ध केले ? | Neelam Gorhe | Shivsena - BJP

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.