Uttam Jankar : पवारांच्या आमदारांची वीज अधिकाऱ्यांना दमदाटी; बंगल्यावर बोलावून हातात हंडे देत कपडे काढण्यास सुनावले

Malshiras News : माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचा महावितरण अधिकाऱ्यांशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वेळापूरच्या पाणीपुरवठा विहिरीचा वीजपुरवठा सुरू न केल्याने अधिकाऱ्यांना दमबाजी केल्याचा आरोप होत आहे.
Uttam Jankar
Uttam JankarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 12 October : माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वेळापूर येथील पाणीपुरवठ्याच्या विहिरीचा वीजपुरवठा सुरू न केल्याने महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना बंगल्यावर बोलावून त्यांच्या हातात हंडे देऊन कपडे काढा, अशी दमबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नवा वाद उद्‌भवण्याची शक्यता आहे.

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला वीजपुरवठा सुरू केला नाही; म्हणून आमदार उत्तम जानकर प्रचंड संतापल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. त्यांनी महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांच्या हातात हंडे देऊन कपडे काढा अशी दमबाजी केल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. तेवढ्यात शेजारच्या कार्यकर्त्याने वीजपुरवठ्याबाबत जाणून बुजून केल्यासारखं करतात आणि काय, असे सांगितले.

तुम्ही शर्ट काढा, नाही नाही... शर्ट काढा, मी सांगतो इथं. तुमी दोघंबी शर्ट काढा चला, पाणी चालू करून घ्या आणि उद्या ज्यांचे नळ आहेत, त्यांना ते देऊन टाकायचे. त्यावर अधिकारी ज्याचे त्याचे नळ देऊन टाकतो, असे सांगतात. त्यानंतरही आमदार जानकर हे रागाने ते कोणाला द्यायचे हे मला सांगायचे नाही, अशी धमकीवजा भाषा संबंधित अधिकाऱ्यांना वापरत असल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे

Uttam Jankar
Someshwar Sugar Result : ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांना चॅलेंज देणाऱ्या पुरुषोत्तम जगतापांना राष्ट्रवादीने धूळ चारली; 6464 मतांनी पराभव, पक्षाची सात जागांवर बाजी...

अवघ्या १० मिनिटांत वेळापूर येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे वीज कनेक्शन आताच्या आता सुरू करायचं. वीजपुरवठा सुरळीत करूनच इथून जायचं, अशी भाषा वापरत असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Uttam Jankar
Someshwar Result : सोमेश्वर कारखान्यात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची बहुमताकडे घौडदौड; जगताप, पवारांच्या राष्ट्रवादीला 21-0 ने क्लिनस्वीप देणार...

आमदार उत्तमराव जानकर यांचा हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, त्यामुळे त्याची जोरदार चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com