Mangalwedha ward-wise reservation : मंगळवेढ्यात प्रभागनिहाय आरक्षण अनेकांच्या सोयीचे; माजी नगरसेवकाला मिळू शकते पुन्हा संधी

Mangalwedha municipal election 2025 News: मंगळवेढा नगरपलिकेच्या 20 जागांसाठी नगरपालिकेच्या सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये निम्म्याहून अधिक माजी नगरसेवकाला पुन्हा या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची संधी मिळणार आहे.
Mangalvaedha muncipal
Mangalvaedha muncipal Sarkarnama
Published on
Updated on

हुकूम मुलाणी

Mangalvedha News : मंगळवेढा नगरपलिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. याठिकाणचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर बुधवारी नगरपालिकेच्या 20 जागांसाठी नगरपालिकेच्या सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये निम्म्याहून अधिक माजी नगरसेवकाला पुन्हा या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची संधी मिळणार आहे. एकूणच ऐन दिवाळीत आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवाराचे दिवाळ तर मतदारांची दिवाळी होणार आहे.

उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी माळशिरसचे मुख्याधिकारी सुमित जाधव, प्रशासन अधिकारी सचिन मिसाळ, लेखापाल आश्विनकुमार भोई, राम पवार, गणेश माळी उपस्थित होते.

Mangalvaedha muncipal
BJP Politics : पदवीधर निवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडी चेकमेट, राष्ट्रवादीचा मुख्य चेहराच फोडला

मंगळवेढा नगरपालिकेच्या 20 जागेसाठी बुधवारी सकाळी आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रत्येक प्रभागात एक एक महिलेसाठी आरक्षित करण्यात आला. तर विद्यमान नगरसेवकापैकी नगराध्यक्षा अरूणा माळी, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, चंद्रकांत घुले, रतन पडवळे, पांडुरंग नाईकवाडी, प्रशांत यादव या नगरसेवकांना पुन्हा लढण्याची संधी मिळणार आहे. आरक्षण सोडतीत प्रभागनिहाय आरक्षण हे अनेकांच्या सोयीचे झाल्यामुळे यामध्ये होत असलेल्या लढती या एकास एक तुल्यबळ ठरणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची दिवाळी जोरात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mangalvaedha muncipal
Mahayuti Final Plan: महायुतीचा स्थानिकसाठीचा 'फायनल' प्लॅन ठरला; सत्ता टिकवण्यासाठी तीन पक्षांची गुप्त रणनीती उघड!

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभाग क्र.1 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , प्रभाग एक ब : सर्वसाधारण तर प्रभाग 2 अ : सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 ब : सर्वसाधारण, प्रभाग 3 अ : अनुसूचित जाती महिला, प्रभाग 3 ब : सर्वसाधारण, प्रभाग 4 अ : सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 ब : सर्वसाधारण, प्रभाग 5 अ : सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 6 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 6 ब : सर्वसाधारण, प्रभाग 7 अ : नागरिकांचा मागासवर्ग महिला, प्रभाग 7 ब : सर्वसाधारण, प्रभाग 8 अ : सर्वसाधारण महिला, प्रभाग 8 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 9 अ : सर्वसाधारण महिला, प्रभाग 9 ब : सर्वसाधारण, प्रभाग 10 अ : सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 ब अनुसुचित जाती.

Mangalvaedha muncipal
Shivsena UBT Crisis : तळकोकणात ठाकरेंची शिवसेना संकटात! ‘आऊट गोईंग’ही वाढले, नेत्यांचा भाजप-शिंदे गटाकडे ओढा

आरक्षण जाहीर करीत असताना माजी नगरसेवक अजित जगताप, चंद्रकांत पडवळे, चंद्रशेखर पडवळे, प्रवीण खवतोडे, प्रतिक किल्लेदार, गौरीशंकर बुरकूल, सोमनाथ माळी, सुदर्शन यादव,नागेश डोंगरे सुशांत हजारे, ज्ञानेश्वर कोंडूभैरी, ज्ञानेश्वर भगरे, प्रकाश खंदारे, खंडू खंदारे, राहुल घुले, मुझमिल काझी,अजय गाडे, आदी उपस्थित होते.

Mangalvaedha muncipal
Vijay Wadettiwar On Jarange: मनोज जरांगे पाटील तुमचा बोलविता धनी कोण? विजय वडेट्टीवारांची भाजपवर शंका

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठींबा देत मदत केली आहे. आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने (BJP) महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे जर त्यांनी स्वबळाचा नारा दिला तर आम्ही स्थानिक मित्र पक्षाची मदत घेऊन स्वबळावर लढू.

- अजित जगताप, मतदारसंघ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मंगळवेढा

Mangalvaedha muncipal
BJP Shirdi controversy : कट्टर समर्थकाची थेट वेशीवरच सुजय विखेंविरोधात बॅनरबाजी; लोणी ते शिर्डी पायी येण्याची करून दिली आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com