Phaltan Manoj Jarange Sabha : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये आज (शुक्रवार) सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होत आहे. जरांगे पाटील यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करत हलगी व तुतारीच्या निनादात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. या सभेला शहर व ग्रामीण भागातील मराठा समाज लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण समन्वयकांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडी व छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या व प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फलटण Phaltan या ऐतिहासिक नगरीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil हे प्रथमच येत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 24 ऑक्टोबर ही डेडलाइन दिली आहे.
त्या पार्श्वभूमीवर अगोदर दोन दिवस मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे येत असल्याने ते केंद्र व राज्य सरकारला कोणता इशारा देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. फलटण तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी आत्तापर्यंत तब्बल 28 गावांत मराठा क्रांती मोर्चा फलटण या शाखा उघडल्या आहेत.
फलटण नगरीत आज सायंकाळी पाच वाजता येत असून, त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाईक रॅलीचे आयोजन केले हाोते. या बाइक रॅलीने फलटण शहरात मराठा समाजात जनजागृती करण्यात आली आहे. Maharashtra Political News
बारामती मार्गावरून मनोज जरांगे पाटील हे येणार असून त्यांचे स्वागत जेसीबीतून पुष्पवृष्टी करून हलगी व तुतारीच्या निनादात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभा होणार आहे. दरम्यान, या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला कोल्हापूरचे मराठा मार्गदर्शक व कायदेशीर अभ्यासक बाबा इंदलकर हेही मार्गदर्शन करणार आहेत.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.