-सल्लाउद्दीन चोपदार
Maan Maratha Reservation : सरकारने आरक्षणचा ठोस निर्णय तातडीने घ्यावा, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज सातारा-लातूर रस्त्यावर दिवड येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या रस्त्यावरील सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली हाेती. म्हसवड पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मनोज जरांगे पाटील Manoj Jarange patil यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाजास Maratha Reservation सरकारने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी म्हसवड शहर व परिसरातील मराठा समाजाने आक्रमक अशी भूमिका घेतली आहे. म्हसवड शहरात रात्री कॅंडल मार्च पदयात्रा काढण्यात आली.
म्हसवड बंदही ठेवण्यात आले होते. आज सकाळी सातारा-लातूर रस्त्यावर म्हसवडपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील दिवड येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनात महिलांचाही सहभाग होता. म्हसवड येथील आठवडा बाजार असल्याने या बाजारासाठी याबरोबरच पंढरपूर, सोलापूर कडे ये-जा करणारी वाहने या आंदोलनामुळे थांबून राहिली. Maharashtra Political News
या आंदोलनास हिंसक वळण न देता मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन पार पाडले. लोधवडे येथेही सातारा-लातूर रस्त्यावर सकल मराठा समाजाने आज सकाळी आंदोलन केले. सरकार मराठा समाजास आरक्षण देण्यास विलंब लावत असल्याच्या निषेधार्थ रस्त्याच्या मध्यभागी टायर जाळण्यात आले.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.