Maharashtra Politic's : महाराष्ट्रातील बड्या नेत्याचे भाकित; ‘महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो’

Prithviraj Chavan Statement : अमेरिकेतील एपस्टाईन फाईल्स प्रकरण गंभीर असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणाचा भारताच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो आणि महिन्याभरात मराठी नेता पंतप्रधान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on
  1. अमेरिकेतील ‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरण गंभीर असून ते उघड झाल्यास भारताच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

  2. त्या फाईलमध्ये अनेक देशांच्या मोठ्या नेत्यांची नावे असल्याचा दावा करत भारतीय नेतेही यात असू शकतात, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

  3. या परिस्थितीत महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असे सूचक विधान करून चव्हाण यांनी राजकीय चर्चेला उधाण आणले.

Karad, 01 December : अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांपासून एपस्टाईन फाईल्स संदर्भात मोठा गदारोळ सुरू आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे आहे. ती फाईल उघड झाल्यावर भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

कऱ्हाडला (जि. सातारा) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड अमित जाधव, अजितराव पाटील-चिखलीकर आदी उपस्थित होते.

एपस्टाईन फाईल्स प्रकरणासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त करुन माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, अमेरिकेतील (America) एका उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर गोष्टी करत अनेक राजकीय लोकांना त्यात गुंतवले आहे. त्यामध्ये अनेक देशातील मोठ्या लोकांची नावे आहेत. त्यामध्ये आपल्या देशातील कोणाची नावे आहेत का हे पहावे लागेल.

‘एपस्टाईन फाईल्स’ हा विषय आंतरराष्ट्रीय आहे. सुमारे १० हजार पानांची ती फाईल अमेरिकेच्या संसदेने ताब्यात घेतली आहे. ती फाईल खुली करावी, यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव वाढत आहे. ती फाईल प्रकाशित झाली, तर बरंच काही समोर येईल.

दरम्यान ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एक व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओमध्ये देखील ती कागदपत्रे लवकरच मला मिळतील, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये उलतापालथी होण्याची शक्यता माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले.

Prithviraj Chavan
Sangola Raid Case : छापेमारीप्रकरणी शहाजीबापूंनी घेतली दोन मोठ्या नेत्यांची नावे; फडणवीस-शिंदेंकडे तक्रार करण्याचा दिला इशारा

पंतप्रधान होणारा मराठी माणूस कोण?

मराठी माणूस पंतप्रधान बनू शकतो, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी ट्टिट करत म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे. त्यावर पत्रकारांशी चव्हाण यांना नेमका कोण मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो याबाबत विचारले असता आता ते तुम्ही शोधा, असे सांगत जादा बोलणे टाळले.

....तर निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी?

निवडणुक आयोगाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. तयारी नव्हती तर निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी? असा सवाल करुन माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वर्षे लांबल्या गेल्यानंतर आता अचानक जाहीर झालेल्या निवडणुकांवरही चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. आता ऐनवेळी काही निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. हा सगळा पोरखेळ करून टाकला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या सगळ्या गोंधळाला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.

Prithviraj Chavan
ShahajiBapu Office Raid : शहाजीबापूंच्या कार्यालयासह सांगोल्यातील चार ठिकाणच्या छाप्यात 28 लाखांची रोकड सापडली; पोलिसांनी ‘त्या’ सराफाला काय सांगितले?

1. ‘एपस्टाईन फाईल्स’ का महत्त्वाची मानली जाते?

सुमारे १० हजार पानांच्या या फाईलमध्ये अनेक देशांच्या मोठ्या नेत्यांची नावे असल्याचे म्हटले जाते.

2. भारतीय राजकारणावर याचा कसा परिणाम होऊ शकतो?

भारतीय नेत्यांची नावे असल्यास मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे चव्हाण म्हणतात.

3. चव्हाण यांनी “मराठी पंतप्रधान” म्हणत कोणाकडे इशारा केला?

चव्हाण यांनी नाव स्पष्ट न करता पत्रकारांना “ते तुम्ही शोधा” असे म्हटले.

4. निवडणुका अचानक जाहीर झाल्याबाबत चव्हाण यांनी काय टीका केली?

तयारी नसताना निवडणुका घेण्याची गडबड करून राज्य सरकारने सावळा गोंधळ केला, असा त्यांचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com