Sangola Raid Case : छापेमारीप्रकरणी शहाजीबापूंनी घेतली दोन मोठ्या नेत्यांची नावे; फडणवीस-शिंदेंकडे तक्रार करण्याचा दिला इशारा

Shahahjibapu Patil Reaction : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांनी कटकारस्थान केल्याचा आरोप केला. सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे जेरबंद केल्याचे त्यांनी सांगितले.
Shahahjibapu Patil
Shahahjibapu Patil Sarkarnama
Published on
Updated on
  1. सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व दीपक साळुंखे यांनी कटकारस्थान करून त्यांना जेरबंद केल्याचा आरोप केला.

  2. शहाजीबापू यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी छापेमारी झाली असून एका सराफ व्यावसायिकाकडे २८.५० लाखांची रोकड सापडल्याने राजकीय आरोप–प्रत्यारोप चिघळले.

  3. स्वतःवर अन्याय होत असल्याचा दावा करत पाटील यांनी सर्व घडामोडी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व अजित पवार यांच्या कानावर घालण्याची चेतावणी दिली.

Solapur, 01 December : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने आणि माझ्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान करून मला जेरबंद केले. जयकुमार गोरेंनी सांगोल्याचे राजकारणाचे वळण बिघडवून टाकले आहे. सांगोल्यातील सर्व घडामोडी मी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार असल्याचा इशाराही शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला.

माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या संपर्क कार्यालयासह चार ठिकाणी सांगोल्यात रविवारी छापेमारी करण्यात आली. त्यातील एका सराफ व्यावसायिकाकडे २८ लाख ५० हजारांची रोकड सापडली आहे. त्याबाबत बोलताना शहाजीबापूंनी पालकमंत्री गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर निशाणा साधला.

शहरातील सभा संपल्यानंतर मलाच जेरबंद करण्यात आले. रफीक नदाफसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. हे काय बरोबर नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar gore) यांनी अजूनही विचार करावा. मी माझ्या भाषणात भाजप सत्तेपासून दूर राहिल्यामुळे गुवाहाटीला गेल्याचे सांगितले आहे. तरीही या लोकांना आमच्या भावना समजत नाहीत, हे सांगताना शहाजीबापू पाटील भावनिक झाले होते.

माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोला नगरपरिषद निवडणुकीत घडलेल्या सर्व घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगणार आहे. राजकारणाचे वळण जयकुमार गोरेंनी बिघडवून टाकलं आहे. दीपक साळुंखे हा आता गोरेंचा सल्लगार झाला आहे. हे काही बरोबर नाही. मी आजारी आहे. मला गोळ्या घ्यायच्या होत्या, तरी मला त्यांनी अडकवून ठेवले.

Shahahjibapu Patil
ShahajiBapu Office Raid : शहाजीबापूंच्या कार्यालयासह सांगोल्यातील चार ठिकाणच्या छाप्यात 28 लाखांची रोकड सापडली; पोलिसांनी ‘त्या’ सराफाला काय सांगितले?

विरोधकांना पराभव दिसू लागल्याने त्यांनी माझ्या दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पण, मी दबावाला बळी पडणारा माणूस नाही. तसेच, डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या निर्णयामुळे (स्व.) गपणतराव देशमुखांच्या राजकारणाची घडी त्यांनी विस्कटून टाकली आहे. हे सर्व विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या एका वर्षात झालं आहे. पण मी हे विस्कटू देणार नाही, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.

शिवसेनेचा उपनेता असूनही मला त्रास दिला जातोय

भाजपसाठी मी काय काय केलं, हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माहिती आहे. माझं सरकार असताना मला असा त्रास द्यायला नको होता. मी शिवसेनेचा उपनेता असूनही मला त्रास दिला जात आहे. मला अशी का वागणूक देता. काँग्रेस सरकारने अशी वागणूक दिली असती तर मला काही वाटलं नसतं.

Shahahjibapu Patil
Sangola : सांगोल्यात शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर LBC ची धाड : भाजप-शेकापचीही झाडाझडती

मुख्यमंत्र्यांची सभा म्हणून शिवसेनेच्या उमेदवारांना डांबून ठेवले

माझ्याजवळील दहा ते बारा कार्यकर्त्यांच्या घरी छापे टाकून त्यांना जेरबंद करण्यात आले. आम्हाला घराबाहेर पडू दिले नाही. ही निवडणूक लढविण्याची पद्धत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे; म्हणून शिवसेनेचे सर्वच उमेदवार कोंडून ठेवले होते. त्यांना कोंडून का ठेवले होते, असे विचारले तर फडणवीसांच्या सभेत गोंधळ घालतील म्हणून त्यांना ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. ते आमचे नेते आहेत, आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करू शकत नाही. हे आमचे दुःख आहे. तुम्ही का आमचे उमेदवार ठेवले आहेत. पोलिसांना विनंती करून आमच्या लोकांना सोडवून आणले, असा दावा शहाजी पाटील यांनी केला.

1. शहाजीबापू पाटील यांची मुख्य तक्रार काय आहे?

पालकमंत्री गोरे आणि दीपक साळुंखे यांनी कटकारस्थान करून त्यांना व कार्यकर्त्यांना जेरबंद केल्याचा त्यांचा आरोप आहे.

2. छापेमारीत काय आढळले?

एका सराफ व्यावसायिकाकडे २८.५० लाखांची रोकड सापडली.

3. शहाजीबापू हे पुढे काय करणार आहेत?

सर्व घटना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांना सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले.

4. शहाजीबापू यांनी पोलिस कारवाईबाबत काय आरोप केला?

मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ घालतील या कारणावरून शिवसेनेच्या उमेदवारांना घरात कोंडून ठेवले, असा त्यांचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com