ShahajiBapu Office Raid : शहाजीबापूंच्या कार्यालयासह सांगोल्यातील चार ठिकाणच्या छाप्यात 28 लाखांची रोकड सापडली; पोलिसांनी ‘त्या’ सराफाला काय सांगितले?

Sangola Nagar Parishad Election 2025 : सांगोला नगरपरिषद निवडणुकीपूर्वी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी छापे टाकले. तीन ठिकाणी काहीच सापडले नाही, तर सराफ व्यावसायिकाकडून ₹२८.५ लाख रोकड जप्त झाली.
Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSarkarnama
Published on
Updated on
  1. सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या दोन दिवस आधी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापेमारी केली.

  2. तीन ठिकाणी काहीही आढळले नाही; मात्र सराफ व्यावसायिक क्षीरसागर यांच्या घरातून २८.५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

  3. रोकड सराफ व्यवसायाची असल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला असून त्यांना त्या पैशांचे दस्तऐवज आता सिद्ध करावे लागणार आहेत.

Solapur, 01 December : सांगोला नगरपरिषद निवडणुकीला दोन दिवस उरले असताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली. शहाजीबापू पाटील यांच्यासह तीन ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत काही सापडले नाही. मात्र, एका सराफ व्यावसायिकाच्या घरात 28 लाख 50 हजार रुपयांची रोकड सापडल्याची माहिती भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या दोन भरारी पथकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाच्या मदतीने हे छापासत्र राबविले. शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांचे संपर्क कार्यालय, पाटील यांचे मित्र माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांचे घर, सांगोला शहर विकास आघाडीचे कार्यालय आणि शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांचे निकटवर्तीय असलेले सराफ व्यावसायिक क्षीरसागर यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती, त्यामुळे सांगोल्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यातील (Sangola) सभा पार पडल्यानंतर रविवारी (ता. ३० नोव्हेंबर) काही तासांतच माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची सभा झाली. ती सभा संपवून शहाजीबापू हे कार्यालयात जातातच निवडणूक आयोगाच्या (एफएसटी) भरारी पथकाने अचानक छापेमारी सुरू केली, त्यामुळे त्यांना काय होत आहे, हे काही काळ समजलेच नाही. ही कारवाई रविारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे कार्यालय, त्यांचे मित्र माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांचे घर, सांगोला शहर विकास आघाडीचे कार्यालय या तीन ठिकाणच्या छापेमारीत काहीही आढळून आले नाही. मात्र, शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांचे निकटवर्तीय असलेले सराफ व्यावसायिक क्षीरसागर यांच्या घरात साडे अठ्ठावीस लाखांची रोकड सापडली आहे. ती रोकड पोलिसांनी जप्त केली असून त्यासंदर्भातील माहिती पोलिस क्षीरसागर यांच्याकडून मागवून घेत आहेत.

Shahajibapu Patil
Jayant Patil : सरकारकडून पैसे कसे आणायचे?, हे या जयंत पाटलाला माहिती आहे : जयंतरावांनी शड्डू ठोकला

दोन पुरुष घराबाहेर दिसले, तिथे पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने सांगोल्यात क्षीरसागर यांच्या निवासस्थानी छापा टाकली, त्यावेळी त्यांच्या घरात सुमारे २८ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली आहे. ती रोकड जप्त केली असून त्याची कागदपत्रे मागितली आहेत.

‘आमचा सराफ व्यवसाय असल्याने ती रक्कम घरात ठेवण्यात आली होती, असे क्षीरसागर यांनी भरारी पथकाला सांगितले. आता ती रोकड स्वतःची असल्याचे क्षीरसागर यांना सिद्ध करावे लागणार आहे.

Shahajibapu Patil
Angar election update : अनगर निवडणुकीबाबत मोठी अपडेट; राजन पाटलांना धक्का नाही, अधिकाऱ्यांनी सगळं क्लिअर केलं...

1. छापेमारी कुठे करण्यात आली?

शहाजीबापू पाटील यांचे कार्यालय, रफिक नदाफ यांचे घर, शहर विकास आघाडीचे कार्यालय आणि सराफ व्यावसायिक क्षीरसागर यांच्या घरी.

2. छापेमारीत काय सापडले?

फक्त क्षीरसागर यांच्या घरातून २८.५० लाखांची रोकड सापडली.

3. रोकड जप्त का करण्यात आली?

निवडणूक काळात पैसे वाटपाची शंका असल्याने रोकड जप्त केली गेली.

4. क्षीरसागर यांनी रोकडीबाबत काय म्हटले?

ती रक्कम सराफ व्यवसायातील असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांना पुरावे सादर करावे लागतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com