Karad Yashvant Bank Scam: कराडच्या यशवंत बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, शेखर चरेगावकरांना अटक, मेधा कुलकर्णींनी उठवला होता आवाज

Karad Yashwant Bank Case: भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी थेट राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली होती.
Yashwant bank Scam  (1).jpg
Yashwant bank Scam (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Karad News : कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील 112 कोटी 10 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. गेले काही दिवस पोलिसांना चकवा देत होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेला बुधवारी (ता.25) मध्यरात्री चरेगावकर यांना विंग गावातून अटक करण्यात यश आलं आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

कराड शहर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर 2025 रोजी यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि चरेगावकर यांच्या नातेवाईकांसह एकूण सुमारे 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी या प्रकरणातील त्याचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.

यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ऑडिटमध्ये बोगस कर्जप्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अपहार झाल्याची बाब उघडकीस आल्यानं मोठं धाबं दणाणलं होतं. या प्रकरणी सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यात तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, पाच अधिकारी आणि संबंधित नातेवाईक यांनी संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण न घेता कर्जवाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

तसेच बँकेकडून जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नव्यानं कर्जखाती उघडणं, निधीचा गैरवापर करणे, दस्तऐवजांमध्ये फेरफार करणे आणि बनावट नोंदी करत ठेवीदार व सभासदांची फसवणूक करण्यात आल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

Yashwant bank Scam  (1).jpg
Top 10 News: भाजपच्या गोटात मोठी राजकीय घडामोड,पंकजा मुंडेंना पर्याय तयार करण्याचा भाजपाचा डाव फसला,माजी मंत्र्यांच्या मुलाचा भाजपप्रवेश ठरला

कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत 9 ऑगस्ट 2014 ते 31 मार्च 2025 या कालावधीत संबंधित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी कराड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजामीनपात्र कलम नोंदवण्यात आल्यामुळे आरोपींविरोधात थेट अटकेची कारवाई सुरू पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ईडीने याप्रकरणी 23 डिसेंबर 2025 रोजी मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या बंगल्यासह फलटण येथील यशवंत बँकेच्या शाखेवर छापा टाकला होता. यावेळी चरेगावकरांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल कुलकर्णी यास अटक केली होती. तसेच त्यांचा दुसरा भाऊ मुकुंद उर्फ शार्दुल चरेगावकर याचीही दिवसभर कसून चौकशी करण्यात आली होती. आरोपी चरेगावकर त्यावेळी नागपुरात होते. नंतर ईडीने त्यांची मुंबई कार्यालयात चौकशी केली होती. यानंतर आता कराड शहर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास जिल्हा अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Yashwant bank Scam  (1).jpg
Rajyasabha Election : पंकजा मुंडेंना पर्याय तयार करण्याचा भाजपाचा डाव फसला; संधी मिळालेले भागवत कराड अन् रमेश कराड ठरले फेल!

यावेळी ईडीकडून कागदपत्रांची झाडाझडती घेतली गेली आहे. मुख्य आरोपीच्या अटकेनंतर तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात आणखी कोणाचे नावे समोर येतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शेखर चरेगावकर यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी थेट राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली होती.

Yashwant bank Scam  (1).jpg
Maharashtra BJP: भाजपच्या गोटात मोठी राजकीय घडामोड; राज्यसभेसाठी धक्कातंत्र? बीडच्या 'या' महिला नेत्याचं नाव अचानक आलं समोर

मेधा कुलकर्णी यांनी कराडमध्ये जात यशवंत बँकेच्या ठेवीदार व कर्जदारांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या.तसेच त्यांनी याप्रकरणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. यावेळी शाह यांच्याकडे त्यांनी सीबीआयमार्फत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीला शाह यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठेवीदारांना दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com