Nana Patole News: ट्विटरवर टिवटिव करून चालणार नाही, CM शिंदेंच्या शेतीसंदर्भातील पोस्टवर पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole On CM Eknath Shinde : शेतात राबतानाचा आनंद काय असतो याबाबतची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे. त्यांच्या याच पोस्टवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.
Eknath Shinde Nana Patole
Eknath Shinde Nana PatoleSarkarnama

Nana Patole: एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी शेतात रमले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी शेत शिवारात फिरण्यात वेळ दिला आहे. यावरुन आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. शेतात राबतानाचा आनंद काय असतो याबाबतची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे. त्यांच्या याच पोस्टवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.

महाराष्ट्रातला शेतकरी रोज आत्महत्या करत आहे, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, शेतामध्ये जा तुम्हाला कोण थांबवणार आहे. पण महाराष्ट्रातला शेतकरी आज तडफडत आहे. त्याच्या शेतात पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही. त्याच्या पिकाला भाव नाही. तो रोज आत्महत्या करत आहे. त्याची काळजी करण्याची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या शेतात जायला कोणाचाच विरोध नाही, ते तीन दिवस सुट्टीवर आहेत. परंतु, फक्त मेसेजवर, ट्विटरवर टीव-टिव करून चालणार नाही. अशा शब्दात पटोले (Nana Patole) यांनी टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसंच आता वास्तविक मैदानात उतरून काम करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र पेटतोय आणि मुख्यमंत्री आपल्या शेतात आराम करत आहेत. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला नाही, याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल, असा हल्लाबोल पटोले यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केला.

दरम्यान, नाना पटोले यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जे झालं आहे, त्याचं समर्थन करता येत नाही. परंतु, मनुस्मृतीचा विरोध काँग्रेस पक्ष सतत करत आहे. मनुस्मृती महाराष्ट्रात लागू करू दिली जाणार नाही. शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. मनुस्मृती लागू केली जाऊ शकत नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असं पटोलेंनी स्पष्ट केलं.

Eknath Shinde Nana Patole
Ravindra Dhangekar News : माझा हक्कभंग करणाऱ्याचा मी भंग करेल; धंगेकरांचा शंभूराज देसाईंना इशारा

काय आहे मुख्यमंत्री शिंदे यांची पोस्ट?

परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा

शेत पिकाची दुनिया न्यारी, वसे जिथे विठूरायाची पंढरी...

"लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली.

जीवाला जीव देणाऱ्या गाई-गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते." अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन केली आहे.

Eknath Shinde Nana Patole
Pune Porsche Accident Update : पब संस्कृतीवर येणार निर्बंध, नाईट लाईफ संदर्भात नवी नियामावली ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com