Sangli news: मिरजेत शासकीय रुग्णालयाची कमान कोसळली, 7 जण जखमी, दोघे अत्यावस्थ

Miraj hospital gate collapse: मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निर्माणाधीन स्वागत कमानीचा स्लॅब कोसळून सात जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
new entrance arch collapsed at Miraj Government Hospital in Sangli
new entrance arch collapsed at Miraj Government Hospital in SangliSarkarnama
Published on
Updated on

Miraj hospital gate collapse: सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात सोमवारी (ता.२१) मोठी दुर्घटना घडली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्वागत कमानीचा भाग कोसळून त्यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन जण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिली आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आज स्वागत कमानीचा भाग जोडण्याचे काम सुरू होते. स्वागत कमानीचे स्लॅब जोडून यामध्ये सिमेंट काँक्रीट ची भरणी केली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कमानीचा स्लॅब कोसळला. या कमानीच्या ढिगारा केला जवळपास सात जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे एकच धांदल उडाली.

याची माहिती मिळताच मिरज शासकीय रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साह्याने ढिगार्‍याखाली अडकल्यापैकी सात जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

new entrance arch collapsed at Miraj Government Hospital in Sangli
Maharashtra Political Live Update : कृत्रिम पावसाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरचा : जयकुमार गोरे

कमानीच्या कामाचा स्लॅब टाकत असताना ही दुर्घटना घडली असून यात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

new entrance arch collapsed at Miraj Government Hospital in Sangli
Maharashtra Political Live Update: 'गणेशोत्सवाला कुठलेही विघ्न येऊ नये,एवढीच आमची अपेक्षा...'; मुख्यमंत्री फडणवीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com