Khatav News : 'माझ्या पराभवासाठी विरोधकांकडून जातीपातीचे राजकारण...' ; आमदार गोरेंचा घणाघात

Jaykumar Gore मी कुणाच्या नादाला लागत नाही आणि नादाला लागलो तर नाद पुरा केल्याशिवाय गप्प बसत नाही, असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

-अय्याज मुल्ला

Khatav Political News : विरोधकांनी कधीच पाण्यासाठी आणि विकास कामांसाठी आपल्या विरोधात लढाई केली नाही. त्यांनी कधी रस्ते, पाणी योजना, एमआयडीसीसाठी संघर्ष केला नाही. जातीपातीचे राजकारण करुन जयकुमारचा पराभव करणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. गेल्या निवडणूकीत २८ जण एकत्र आले मात्र त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी वडुज येथील सभेत स्पष्ट केले.

वडुज (ता. खटाव) शहरासाठी मंजूर झालेल्या केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २ योजनेंतर्गत ४६ कोटी ६७ लाख रुपये खर्चाच्या पाणी योजनेच्या कामाच्या भूमिपूजन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore होते.

आमदार जयकुमार गोरे यांच्या कामांच्या झपाट्यामुळे खटाव तालुक्याचा कायापालट होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या भागातील दुष्काळी पाणीयोजना, ग्रीन कॉरिडॉर, एमआयडीसी, रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. जिहे कठापूरच्या पाणी पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मंत्रीमंडळ लवकरच माण मतदारसंघात येणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

आमदार गोरे म्हणाले, विरोधकांनी कधीच पाण्यासाठी आणि विकास कामांसाठी आपल्या विरोधात लढाई केली नाही. त्यांनी कधी रस्ते, पाणी योजना, एमआयडीसीसाठी संघर्ष केला नाही. जातीपातीचे राजकारण करुन जयकुमारचा पराभव करणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. गेल्या निवडणूकीत २८ जण एकत्र आले मात्र त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली. आता तर त्यांच्या नेत्याकडे आठ जणही राहिले नाहीत. त्यांना येथील नगरपंचायतीची सत्ता मिळाली मात्र, नुसत्याच बैठका घेतल्या.

MLA Jaykumar Gore
Satara Loksabha : कोरेगावात नेत्यांचे बेरजेचे राजकारण; दोन्ही शिंदेंपैकी कोण देणार मताधिक्य ?

एक रुपयाचेही काम न झाल्याने नगराध्यक्षांसह बहुतांशी नगरसेवकांनी आपल्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना स्वतःचे पदाधिकारी सांभाळता येत नाहीत त्यांना तालुका आणि मतदारसंघ संभाळता येणार नाही हे जनतेने जाणले आहे. मी कुणाच्या नादाला लागत नाही आणि नादाला लागलो तर नाद पुरा केल्याशिवाय गप्प बसत नाही असा इशाराही त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Jaykumar Gore
Raj Thackeray Live: पुण्यात 'राज' गर्जना! निशाण्यावर कोण ? | MNS | Pune |

औंधमध्ये अख्खे मंत्रीमंडळ येत होते. त्यावेळी कोणाला पाणी योजनेची आठवण झाली नाही. आता औंध परिसरासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने दीड टीएमसी पाणी मंजूर झाले आहे. त्यावेळी मोर्चे, आंदोलनाची नौटंकी सुरू झाली आहे. येथील छत्रपती संभाजीराजे चौकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रूपये,शहरातील पथदिव्यांसाठी दीड कोटी रूपये तसेच भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याचे आमदार गोरे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

MLA Jaykumar Gore
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन्‌ विरोधी पक्षनेते : सबकुछ देवेंद्र फडणवीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com