आमदार किरण लहामटेंचा सरकारला सल्ला : शिक्षकांना त्यांची कामे करू द्या

आमदार डॉ. किरण लहामटे ( Kiran Lahamte ) यांनी शिक्षकांना शुभेच्छा संदेश देताना राज्य सरकारला सल्ला दिला.
Dr. Kiran Lahamte
Dr. Kiran LahamteSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - शिक्षक दिनानिमित्त अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे ( Kiran Lahamte ) यांनी शिक्षकांना शुभेच्छा संदेश देताना राज्य सरकारला सल्ला दिला आहे. शिक्षकांना त्यांची कामे करू द्या, असे त्यांनी सांगितले.

डॉ. किरण लहामटे म्हणाले की, आज शिक्षक दिन त्यानिमित्ताने शिक्षकांबद्दल जो आदर आहे तो मी व्यक्त करीत आहे. शिक्षकांचे ज्ञानदानाचे कार्य महान आहे. हे कार्य त्यांच्याकडून निरंत होत राहो, असे त्यांनी सांगितले.

Dr. Kiran Lahamte
डॉ. किरण लहामटे म्हणाले, सत्ता द्या विकास पहा...

ते पुढे म्हणाले की, मध्यंतरी शिक्षकांचे आंदोलन झाले. यात शिक्षक सांगत होते की, आम्हाला शिकवू द्या. त्यांचे मुख्य काम शिकविणे आहे. ते काम त्यांच्याकडून हेरावून घेतले जात आहे. त्यांना शिकविण्यासाठी कमी वेळ मिळत आहे. त्यांच्यावर सरकारकडून अतिरिक्त कामे लादली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने सरकारने शिक्षकांना अतिरिक्त कामे देऊ नये. त्यांचे ज्ञानदानाचे कार्य महाराष्ट्र व देश घडविणारे आहे. ते काम त्यांना करू दिले पाहिजे. शिक्षकांना अतिरिक्त कामातून मोकळे केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

Dr. Kiran Lahamte
डाॅ. लहामटे का म्हणाले, मी पळकुटा आमदार नाही

शिक्षकांच्या कामाचा सन्मान केला पाहिजे. शिक्षकांविषयी वाईट बोलणे माझ्यासाठी उचित नाही. 99 टक्के शिक्षक हे फार चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा गौरव झाला पाहिजे. जे कोणी कामात कुचराई करत असतील त्यांना समज देणे आवश्यक आहे. मात्र चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव हा केलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com