Solapur Dcc Bank : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुखांची एन्ट्री : 'लोकमंगल'कडून ठराव, शहाजी पवारही मतदार...

Subhash Deshmukh-Shahaji Pawar News : सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीत नागरी बँका मतदारसंघातून भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा लोकमंगल बँकेचा मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संचालकपदाच्या इच्छुकांमध्ये समावेश झाला.
Subhash Deshmukh-Shahaji Pawar
Subhash Deshmukh-Shahaji PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 August : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी नागरी बँका मतदारसंघातून लोकमंगल बँकेचे मतदार प्रतिनिधी म्हणून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचा ठराव झाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या इच्छुक संचालकांच्या यादीत आमदार देशमुख यांच्या नावाचीही भर पडली आहे. या मतदारसंघातून गेल्या वेळी माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी संचालक म्हणून काम पाहिले होते.

माजी आमदार बबनराव शिंदे यांनी १९८५ ते २००० या कालावधीत तीन टर्म सोसायटीच्या माढा मतदारसंघातून डीसीसीचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर माजी आमदार संजयमामा शिंदे सोसायटी मतदारसंघातून डीसीसीत आले. बबनराव शिंदे यांनी २०१० आणि २०१५ मध्ये माढेश्‍वरी अर्बनच्या माध्यमातून नागरी बँका मतदारसंघातून डीसीसीत प्रवेश केला.

आगामी निवडणुकीसाठी माढेश्‍वरी अर्बन बँकेचा ठराव अद्याप झालेला नाही. त्यामुळे यावेळी माजी आमदार शिंदे यांचा पुन्हा ठराव होणार की त्यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांचा ठराव होणार, यावरही या मतदारसंघातील लढतीची चुरस अवलंबून आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील रुक्मिणीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतून भाजपचे प्रांतिक सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचाही ठराव झाला आहे. लोकमंगल बॅंकेमधून आमदार सुभाष देशमुख आणि रुक्मिणीदेवी पतसंस्थेतून शहाजी पवार या भाजपच्या कोअर नेत्यांचे ठराव झाल्याने आता कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. ठराव करण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे आणखी कोणाकोणाचे ठराव होतात, यावरही या मतदारसंघातील उमेदवारीची दावेदारी अवलंबून राहणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नागरी बँका, नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, पगारदार नोकर पतसंस्था, पाणीपुरवठा संस्था, कंझुमर्स, औद्योगिक तसेच इतर मतदारसंघात समावेश न झालेल्या संस्थांमधून डीसीसी बँकेवर संचालक निवडला जातो.

Subhash Deshmukh-Shahaji Pawar
BJP MLA : भाजपच्या चार आमदारांसह माजी खासदार अन्‌ माजी मंत्र्याची कोर्टात हजेरी : महत्वाचे कारण आले पुढे

जिल्ह्यात सध्या ७९६ नागरी बँका आणि पतसंस्था सभासद असून, ७८५ इतर संस्था सभासद आहेत. जिल्ह्यात ११ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. एकूण १ हजार ५९२ सभासद संस्थांपैकी १ हजार ४१३ संस्था मतदार प्रतिनिधींचा ठराव करण्यास पात्र ठरल्या आहेत.

दोन्ही देशमुखांची भूमिका अन्‌ उत्सुकता

डीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख काय भूमिका घेणार, याबद्दल सध्या डीसीसीच्या वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून डीसीसीच्या निवडणुकीसाठी कसे पॅनेल निर्माण होते, त्यात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला सबुरीचा सल्ला दिला जाणार, यावर समोरील पॅनेलची रचना अवलंबून दिसते. आगामी निवडणुकीत माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्या भूमिकेलाही महत्त्व असणार आहे.

Subhash Deshmukh-Shahaji Pawar
Satara Politic's : शंभूराज देसाईंनी अखेर ठेवणीतला डाव टाकला; ZPपासून जिल्हा बॅंकेपर्यंतचा सर्व हिशेब चुकता होणार...

नागरी बँका, पतसंस्था मतदारसंघातील मतदानास पात्र सभासद संख्या

अक्कलकोट : ६०

बार्शी : ११२

करमाळा : ५३

माळशिरस : १७८

माढा : १३६

मंगळवेढा : ७१

मोहोळ : ९५

पंढरपूर : ७२

सांगोला : १०५

उत्तर सोलापूर : ४८९

दक्षिण सोलापूर : ४२

एकूण : १,४१३

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com