Political Crime : माघारीनंतरही डिवचणारे स्टेट्‌स ठेवले; जाब विचारायला गेले अन्‌ जीव गमवावा लागला!

Solapur Corporation Election 2025 : सोलापूर महापालिका निवडणुकीतील शब्दभंग, राजकीय डिवचणी आणि अंतर्गत वादातून जोशी गल्लीतील तणाव वाढत गेला असून एका मनसे पदाधिकाऱ्याच्या मृत्यूने ही घटना गंभीर वळणावर पोहोचली आहे.
Balasaheb Sarvade
Balasaheb Sarvade Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 January : सोलापूर महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत माघार घेऊनही दिलेला शब्द न पाळल्यामुळे जोशी गल्लीतील भाजपचे कार्यकर्ते असलेले सरवदे कुटुंबीय नाराज होते. अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत ते होते. मात्र, समाजात भांडण नको म्हणून समाजातील प्रतिष्ठांच्या शब्दाखातर रेखा दादासाहेब सरवदे यांनी निवडणुकीत माघार घेतली. त्यानंतर शंकर शिंदे यांच्या मुलाने सरवदे कुटुंबीयांच्या विरोधात डिवचणारे मोबाईल स्टेट्‌स ठेवले. तसेच त्यांच्या घरापासून आवाज करत गाड्या फिरवणे, गोंधळ घालायला सुरुवात केली, त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेले मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाला आपला जीव गमावावा लागला.

सोलापूर (Solapur) महापालिकेच्या मागील निवडणुकीत शालन शिंदे आणि रेखा सरवदे यांच्यातच भाजपच्या उमेदवारीसाठी स्पर्धा होती. त्यावेळी जोशी समाजातील प्रमुख व्यक्तींनी दोघांमधील वाद मिटवून पुढील निवडणुकीत सरवदे यांना तिकिट देण्याचा शब्द शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आला होता. समाजातील प्रमुखांच्या शब्दाखातर सरवदे यांनी २०१७ मध्येही महापालिकेच्या रिंगणातून माघार घेतली होती.

नुकत्याच लागलेल्या निवडणुकीत शालन शिंदे आणि रेखा सरवदे ह्या दोघांनीही भाजपकडे (BJP) उमेदवारी मागितली होती. माघार घ्याला कोणीही तयार नव्हते. मागील निवडणुकीत शिंदे कुटुंबीयाने दिलेला शब्द न पाळल्यामुळे सरवदे कुटुंबीय नाराज होते. पक्षाकडून शालन शिंदे यांना एबी फार्म दिला, त्यामुळे सरवदे हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होता. विशेष म्हणजे ही दोन्ही कुटुंबे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

जोशी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी एकत्र येऊन समाजात वाद नको; म्हणून दोन्ही कुटुंबाची बैठक घेतली होती. समाजातील प्रमुख व्यक्तींच्या आग्रहाखातर अखेर रेखा सरवदे यांनी माघार घेतली. मात्र, माघारीनंतर शंकर शिंदे यांच्या मुलाने डिवचणारे स्टेट्‌स ठेवले. तसेच घरापासून दुचाकीच्या सायलन्सरच्या पुंगळ्या काढून सरवदेंच्या घरापासून जोरात आवाज काढत फिरवणे, गोंधळ घालणे असे प्रकार झाले होते. याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख तथा रेखा सरवदे यांचे चुलत दीर बाळासाहेब सरवदे हे शंकर शिंदे यांच्या कार्यालयात गेले होते.

Balasaheb Sarvade
Ajit Pawar Vs BJP : '...तर अजित पवारांची अडचण होईल', 'त्या' वक्तव्यावर भाजपचे खुले आव्हान; रवींद्र चव्हाणांनी सगळंच सांगितलं

शंकर शिंदे यांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी बाचाबाची झाली. त्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला. तेवढ्यात दुसऱ्या गटातील लोकांनी बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यातील दोन वार छातीवर झाले, त्यामुळे त्या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बाळासाहेब सरवदे यांच्या खूनप्रकरणी भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सरवदे यांच्या खुनामुळे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे.

Balasaheb Sarvade
Nashik NMC Election : गिरीश महाजनांनी लावलेला जोर थोडा कमीच पडला, नाशिकमध्ये 'या' उमेदवारांची बंडखोरी राहिली कायम..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com