

Akluj, 06 July : जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डाॅ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बलराज अश्वाची विधिवत पूजा करून देहूकडे रवाना करण्यात आला. गेल्या ४० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्या (ता. ०७ जुलै) देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्या पालखी सोहळ्यासाठी (स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी अश्व देण्याची प्रथा सुरू केली होती. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे.
मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्र्वाला सजवून त्याची पूजा श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील आणि उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी भजनी मंडळाने भजनसेवा केली. पूजनानंतर अश्र्वाला वाजत गाजत निरोप देण्यात आला.
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी या प्रथा परंपरेबाबत सांगितले की, गेली ४० वर्षांपूर्वी (स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी ही प्रथा सुरू केली असून ती आम्ही पुढे चालवत आहोत. बलराज हा जातीवंत अश्व असून त्याचे वय साडेसात वर्षे आहे.
बलराज या जातीवंत अश्वाने आत्तापर्यंत ४ वेळा पालखी सोहळ्यात सहभाग घेतला आहे. त्याला ६ महिन्यांपासून आम्ही चांगल्या सवयी लावतो, अश्वाबरोबर जात असलेल्या स्वारांसोबत अश्र्वासाठी लागणारा खुराक व इतर साहित्य दिले जाते, असेही मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
या वेळी माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर, मााणिक मिसाळ, अण्णासाहेब शिंदे, दिपक पिंजारी, सत्यवान मगर, जयसिंग मोरे, राजू निकाळजे, सागर देशमुख आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.