

Solapur, 08 November : अक्कलकोटचे माजी आमदार तथा शिवसेनेचे (शिंदे गट) नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाप काढला. शेतकरी सन्मान निधी किंवा केंद्र सरकारकडून विविध योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशाबाबत बोलताना म्हेत्रे यांनी हे विधान केले आहे. ‘मोदींचे पैसे आले; म्हणून धोतर फाटेपर्यंत शेतकरी बँकेत पळतात. हे पैसे तुमचे आहेत. मोदीच्या बापाचे नाहीत,’ असे धक्कादायक वक्तव्य म्हेत्रे यांनी केले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या शेतकरी मदत योजनेवर बोलताना म्हेत्रे म्हणाले, मी शंभर ठिकाणी बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगितले. पण त्यांनी पचार मारलेली कळत नाही तुम्हाला. 2000 घातले की धोतर फाटेपर्यंत बँकेत पळता तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे..
तुमचे पैसे आहेत, ते तुम्ही स्वकष्टाने कमवलेले आणि टॅक्स भरलेले ते पैसे आहेत. त्याने (मोदी यांना उद्देशून) काय त्याच्या बापाच्या घराचं देता नाही, असेही म्हेत्रे यांनी म्हटले आहे.
पुढच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. गेल्या 70 वर्षांत असला प्रकार नव्हता कधी. सत्ताधाऱ्यांना पाणी सोडायचे नाही, यांना फक्त रस्ते करायचे आहेत. रस्ते करायचे कशासाठी? तर यांना 15-20 टक्के कमिशन पाहिजे म्हणून. असे म्हणून त्यांनी ‘बायकोचा भाऊ XXX मऊ’ असे वादग्रस्त विधानही केले आहे.
उजनी परिसरातील प्रस्तावित डेंटा सेंटरवर बोलताना म्हेत्रे म्हणाले, एआय डेटा सेंटर हा गुजरातने नकारलेला प्रकल्प ईकडे आणला आहे. त्यातून आलेले 15-20 टक्के कमिशन खाऊन तेच पैसे इलेक्शनमध्ये वाटतात आणि तुम्ही पण पैसे घेऊन त्यांना मतदान करता. तुम्ही त्यांना मतदान करता आणि पाणी नाही म्हणून आमच्याकडे बोंबाबोंब करता. हे संविधान वाचवा; म्हणून मोर्चा काढतात. मात्र, त्यांना संविधान काय माहिती, असा सवालही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.