Satara Politic's : एकनाथ शिंदेंनी माण-खटावमध्ये जयकुमार गोरेंना दिला तगडा पर्याय; शिवसेनेचा साताऱ्यात ‘माईंड गेम’

Shekhar Gore News : शेखर गोरे यांची शिवसेनेच्या सातारा जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांच्याविरोधातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
Shekhar Gore
Shekhar GoreSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 07 November : डॅशिंग नेतृत्व म्हणून राज्यभर चर्चित असलेले माण-खटावचे नेते तथा सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक शेखर गोरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शेखर गोरे यांच्या रुपाने शिंदे यांनी साताऱ्यात विशेषतः माण खटावमध्ये जयकुमार गोरेंविरोधात तगडा पर्याय उभा केल्याचे मानले जात आहे.

जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देत भाजपने मित्रपक्षाला धक्के दिले आहेत. ते धक्के मित्रपक्षाचे नेते अजूनही विसरलेले नाहीत, हे त्यांच्याकडून वारंवार होणाऱ्या विधानावरून लक्षात येते. त्या धक्क्यांना आता प्रतिधक्के देण्याची तयारी मित्रपक्षाकडून सुरू केल्याचे दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेखर गोरेंच्या माध्यमातून साताऱ्यात पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. डॅशिंग आणि शिवसेनेच्या पठडीतील आक्रमकपणा शेखर गोरे यांच्याकडे आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आलेला अनुभव लक्षात घेऊन शिंदे यांनी गोरे यांना ताकद देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊन भाजप उमेदवार जयकुमार गोरे यांना पाठिंबा द्यावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांना विधान परिषदेचा शब्द दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिल्याने शेखर गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत माघार भाजप उमेदवार जयकुमार गोरे यांना पाठिंबा दिला होता.

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे गोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून आमचं कुठं चुकलं, असं त्यांनी जाहीरपणे विचारले होते.

Shekhar Gore
Solapur Politic's : कोठे-नरोटे वादावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं भाष्य : ‘आपलं वागणं, बोलणं...हायकमांड त्यांना समज देतील’

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ असूनही भाजपने केलेली फोडाफोडी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की शिवसेना विसरली नव्हती. त्यातूनच भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांना चेकमेट देण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

जयकुमार गोरे यांना शह देण्यासाठी त्यांचे बंधू शेखर गोरे यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बेरजेचे राजकारण केले आहे. शेखर गोरे यांच्या माध्यमातून मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात माण खटावमध्ये तगडा पर्याय उभा केला आहे.

एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्याचे आहेत, त्यांची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यातून पालकमंत्री शंभूराज देसाई, रामराजे नाईक निंबाळकर आदी प्रयत्नशील असताना आता त्यांना शेखर गोरे यांची मदत मिळणार आहे. शेखर गोरेंच्या रूपाने शिवसेनेला आक्रमक व डॅशिंग संपर्कप्रमुख मिळाला आहे, त्यामुळे आगामी काळात माण खटाव मतदारसंघातही दोन्ही भावांमध्ये राजकीय संघर्ष धारदार होताना दिसू शकतो.

Shekhar Gore
Subhash Deshmukh : विक्रीला काढलेल्या तुळशी गावच्या मदतीला धावले आमदार सुभाष देशमुख; ‘शिरपूर पॅटर्न’च्या कामाला सुरुवातही केली...

माण-खटावचे राजकारण पुन्हा तापणार

माण-खटाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत गोरे बंधू अनेक वर्षांनंतर एकत्र आले होते. मात्र, भाजपकडून शब्द न पाळल्याने शेखर गोरे नाराज होते. त्यातूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवताना मित्रपक्षासह अनेकांना अंगावर घेतले आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्याच मतदारसंघात शह देण्यासाठी त्यांच्या भावाच्या हाती शिवधनुष्य देत शिवसेनेने माईंड गेम खेळला आहे. गोरे बंधू पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याच्या शक्यतेमुळे माण खटावचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.