पोलीसही चक्रावले; विशाल फटेची कोटीच्या कोटी उड्डाणे काही थांबेनात!

बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरूच आहे.
Vishal Phate
Vishal Phate Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरू आहे. त्याने फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत त्याच्या विरोधात 129 जणांच्या तक्रारी आल्या असून, फसवणुकीची रक्कम तब्बल 25 कोटी रुपयांवर गेली आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढत असल्याने पोलीसही चक्रावले आहेत. दरम्यान, फटेच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी पोलिसांनी (Police) हालचाली सुरू केल्या आहेत.

शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवून कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष विशाल फटने गुंतवणूकदारांना दाखविले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास बसेपर्यंत सुरवातीला तो सुरवातीला पैसे परत करत होता. तो एकाकडून घेतलेले पैसे दुसऱ्या गुंतवणूकदाराला देत असे. या पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणूक न करताही पैसे फिरवत होता. नंतर गुंतवणूकदार वाढल्यानंतर हे त्याच्यासाठी अशक्य झाले. अखेर तो सगळे सोडून फरार झाला होता. फटेच्या विरोधात तक्रार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, फसवणुकीचा आकडाही वाढत आहे. आता हा आकडा तब्बल 25 कोटी रुपयांवर गेला आहे. त्याने हे पैसे नेमके कुठे घालवले याचा शोध पोलीस घेत आहेत. (Vishal Phate News)

Vishal Phate
मला माफ करा! डिसले गुरुजींचा जिल्हा परिषदेसमोर माफीनामा

गुंतवणूकदारांच्याच पैशातून फटेने 45 लाखांची चारचाकी घेतली. याचबरोबर त्याने बार्शीत तब्बल तीन-तीन कोटी रुपयांची दोन घरे बांधली. दरम्यान, गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावत त्याचे ऑफिस गाठण्यास सुरवात केली होती. गुंतवणूकदारांचे पैसे घालवल्याने आणि परत देण्यासाठी पैसे नसल्याने तो पसार झाला होता. त्यानंतर तो स्वत:हून पोलिसांसमोर शरण आला होता. फटे उद्यापर्यंत (ता.2) पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी फटेचे संगणक जप्त केले असून, लॅपटॉप व मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. फटेच्या व्यवहारांचे लेखापरीक्षण सुरू असून चार्टर्ड अकांउंटकडून याबाबत पोलिसांनी लवकरच अहवाल मिळणार आहे. त्यातून फटेने गुंतवणूकदारांची रक्‍कम नेमकी कुठे गुंतवली, हे उघड होईल. (Barshi Scam)

Vishal Phate
मोठी बातमी : अनिल देशमुखांनी आता अनिल परबांना आणलं चांगलंच अडचणीत

विशाल फटेचे मंगळवेढ्यात जुने घर असून, त्याच्या वडिलांच्या नावावर पाच ते सहा एकर शेतजमीन आहे. पोलिसांनी बार्शीचे मुख्याध्याधिकारी व तहसिलदारांना पत्र देऊन फटे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावरील मालमत्तांची माहिती मागविली आहे. त्याच्या भावाने सुमारे 15 तोळे सोने स्वत:हून पोलिसांकडे जमा केले आहे. फटे आणि कुटुंबीयांच्या संपूर्ण मालमत्तांचे मूल्यांकन झाल्यावर गुंतवणूकदारांची यादी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर केली जाणार आहे. यानंतर ही मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. (Vishal Phate Barshi Scam News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com