मला माफ करा! डिसले गुरुजींचा जिल्हा परिषदेसमोर माफीनामा

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे सेलिब्रिटी झाले होते.
Ranjitsinh Disale
Ranjitsinh Disale Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे सातत्याने वादात अडकत आहेत. डिसले यांची रजा मंजूर न झाल्याने त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आणि पैसे मागितल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला होता. या प्रकरणी जिल्हा परिषदेने (ZP) त्यांना खुलासा मागितला होता. अखेर निराधार आरोप करणारे डिसले गुरुजी तोंडावर पडले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेसमोर माफीनामा सादर केला आहे.

डिसले यांना अमेरिकेत फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मंजूर न करण्यात आल्यावरून मोठा गदारोळ उडाला होता. यात थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेप केला होता. त्यावेळी डिसले यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. पैशांची मागणी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. माध्यमांसमोर आरोप करण्यापूर्वी डिसले गुरुजींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा न्यायालयात का गेले नाहीत, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला होता. आता या प्रकरणी त्यांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी पुरावे सादर न केल्यासही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम व जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी वर्तणूक अधिनियमानुसार डिसले यांच्यावर या प्रकरणी कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला होता.

या सर्व प्रकरणात डिसले गुरुजीच अडचणीत आले होते. अखेर त्यांनी माफीनामा सादर करून या वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना डिसले यांनी दोन पानी पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे. यापुढे थेट प्रसारमाध्यमांसमोर जाणार नाही, अशी कबुलीही डिसले यांनी दिल्याचे समजते. त्यांनी आता माफीनामा सादर करीत हे प्रकरण थांबवण्याची मागणी केली आहे. डिसले यांच्या माफीनाम्याची जोरदार चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली आहे.

Ranjitsinh Disale
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का! नगरसेवकालाच लाच प्रकरणात अटक

‘डायट’मध्ये एकदी दिवस हजेरी नाही

लहान मुलांसाठी शिक्षण सोपे व्हावे, यासाठी डिसले यांनी ‘क्‍यूआर कोड’ शिक्षण पध्दती आणली होती. त्यांच्याकडील या ज्ञानाचा लाभ सर्वांना व्हावा, यासाठी त्यांना ‘डायट’वर तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्‍ती देण्यात आली होती. प्रत्यक्षात ‘डायट’च्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याची काहीच नोंद नाही. शाळा आणि ‘डायट’ अशी दोन्ही ठिकाणी हजर नसताना त्यांनी तीन वर्षे सरकारी पगार घेतला होता. या प्रकरणी चौकशी समितीने अहवाल तयार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला आहे. यावर कार्यवाही प्रस्तावित आहे.

Ranjitsinh Disale
समीर वानखेडेंना दणका देणारे निघाले संजय राऊतांचे व्याही!

ग्लोबल टीचर पुरस्काराची नोंदच नाही

अमेरिकेतील फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मिळत नसल्याने डिसले यांनी उघडपणे नाराजी व्यक्‍त केली होती. याचबरोबर नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच, अनेक आरोप केले होते. त्यांच्या आरोपामुळे शिक्षण विभागाची बदनामी झाल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डिसले यांना कशासाठी पुरस्कार मिळाला, त्यांनी त्यात सहभाग कसा घेतला, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाची परवानगी घेतली का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत कोणतीही कागदपत्रे जिल्हा परिषदेकडे नाहीत. आता डिसले यांना ही कागदपत्रे प्रशासनाला सादर करावी लागतील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com