Shinde Vs Gore : जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंवर पलटवार : ‘ दुष्काळी GR जाळणाऱ्या खासदारांच्या बुद्धीची किव येते; त्यांनी वडिलांकडून संस्कार शिकावेत’

Solapur Drought GR News : मंगळवेढा दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी दुष्काळाच्या जीआरची होळी करत पंचनाम्यांवर सवाल उपस्थित केला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिंदेंवर तीव्र शब्दांत टीका करत प्रत्युत्तर दिले.
Praniti shinde-jaykumar gore
Praniti shinde-jaykumar goreSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangola, 04 October : सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला. मात्र, पंचनामे कशासाठी, असा सवाल उपस्थित करत खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दौऱ्यादरम्यान राज्य सरकारने काढलेल्या दुष्काळाच्या जीआरची होळी केली होती. त्याला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले आहे. प्रणिती शिंदेंनी वडिलांकडून काही संस्कार घेतले पाहिजेत. दुष्काळाच्या जीआरची होळी करणाऱ्या खासदार शिंदेंच्या बुद्धीची किव येते, अशा शब्दांत गोरे यांनी टीकेला उत्तर दिले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा दौऱ्यावर असताना दुष्काळी शासन निर्णयाची होळी करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी केली होती. दुष्काळ जाहीर केल्यानंतर पंचनामे कशासाठी, असा सवाल करत कर्जमाफीवरून सरकारवर टीका केली होती. त्याला पालकमंत्री गोरे यांनी आज उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारने काढलेल्या निर्णयाची होळी करण्यापूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनी दुष्काळातील नुकसानभरपाईचे नियम समजून घ्यावेत. त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यामुळे त्यांनी वडिलांकडून काही संस्कार घेतले पाहिजेत.

सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी जीआर काढला असताना त्याची होळी करणे, ही बाब खेदजनक आहे. दुष्काळातील नुकसानभरपाई देण्याचे नियम काय आहेत, दुष्काळ निवारणाची प्रक्रिया काय आहे, कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या पद्धतीने मदत दिली जाते, याचा प्रणिती शिंदे यांनी प्रथम अभ्यास करावा, असा सल्लाही गोरे यांनी प्रणिती शिंदे यांना दिल्या.

Praniti shinde-jaykumar gore
Satara Dcc Bank : महायुतीचं जागावाटपाचं सूत्र ठरलं : शिवेंद्रसिंहराजेनंतर शंभूराज देसाईंनीही केलं 'त्या' गोष्टीवर भाष्य...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत संवेदनशील भूमिका घेऊन त्यांना धीर देणे आवश्यक आहे. दुष्काळ निवारण्यासाठी काढलेल्या जीआरची जळण्याची हिंमत होते, त्यांच्या बुद्धीची कीव येते. पण, त्यांच्या संवेदनशिलतेवर शंका निर्माण होते, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

एकत्रित आलेल्या सांगोल्यातील नेतेमंडळींचे कौतुक

सांगोल्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे हे नेतेमंडळी होते. त्याबाबत पालकमंत्री गोरे यांनी कौतुकाचे उद्‌गार काढले.

Praniti shinde-jaykumar gore
Shahajibapu Patil : शहाजीबापू पाटील यांचं मोठं विधान : ‘आमचा पाठिंबा शिवसेनेला; मंगेश चिवटेंना नाही...’

सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येत आहेत, ही बाब आनंददायी आहे. मात्र, राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांनीही राजकीय मतभेद आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, अशी अपेक्षा गोरे यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com