Municipal Corporation Election : यंदाच्या 31 डिसेंबरला 'इलेक्शन फिवर', पण 'या' गोष्टीची अडचण अन् उमेदवारांच्या खिशाला कात्री

State Election Commission : यंदा महानगरपालिकेची निवडणूक ही 31 डिसेंबरच्या फिवरमध्ये पार पडत आहे. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला असले तरी ऐन निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या धामधुमीत 31 डिसेंबर असल्याने कार्यकर्त्यांच्या मेजवानीचा बेत यंदा जोरात होणार आहे.
Election
Election Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: यंदा निवडणुकीच्या काळात 31 डिसेंबर साजरा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्या दिवशी एकादशी असल्याने अनेकांच्या उत्सवावर व्यक्तिगत निर्बंध येण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीत 31 डिसेंबर आल्याने उमेदवारांच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (ता.15) राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली. गेल्या काही वर्षांपासून या निवडणूक रखडल्याने हेकर्त्यांसह नेत्यांमध्ये नाराजी होती. शिवाय या निवडणुकींची घोषणा कधी होणार याकडे कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. अखेर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करत महानगरपालिकेच्या निवडणुकांचा (Municipal Election) शंखनाद फुंकला आहे.

गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेची मुदत संपल्याने गेल्या साडेचार वर्षांपासून प्रशासक राज अस्तित्वात होते. शिवाय स्थानिक पक्षांसह राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांची देखील कुचंबना झाली होती. अखेर राज्य निवडणूक आयोगांकडे (State Election Commission) या महानगरपालिका निवडणुकांची घोषणा केली आहे.

यापूर्वीचा जर या निवडणुकींचा इतिहास पाहिला तर साधारण नोव्हेंबरच्या टप्प्यात या निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी ही इलेक्शन फीवर मध्ये पार पडत होती. आता मात्र ही निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असल्याने काही विशिष्ट वर्गासाठी ही निवडणूक पर्वणी ठरणार आहे.

Election
Walmik Karad News : 'बघून घेतो म्हणून धमकी, जेलरच्या सांगण्यावरून 'त्या' पोलिसाची तक्रार नाही; वाल्मिक,घुलेनं माफी मागितली?

यंदा महानगरपालिकेची निवडणूक ही 31 डिसेंबरच्या फिवरमध्ये पार पडत आहे. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला असले तरी ऐन निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या धामधुमीत 31 डिसेंबर असल्याने कार्यकर्त्यांच्या मेजवानीचा बेत यंदा जोरात होणार आहे. मात्र काही ठिकाणी या कार्यकर्त्यांच्या आशेवर देखील पाणी फिरण्याची शक्यता आहे.

कारण यंदा 31 डिसेंबरला एकादशी असल्याने अनेक भागात 31 डिसेंबर साजरा करण्या संदर्भात व्यक्तिगत निर्बंध आले आहेत. तर काही ठिकाणी ही व्यक्तिगत निर्बंध बाजूला ठेवून 31 डिसेंबर साजरा होण्याची शक्यता आहे.

Election
Ajit Pawar NCP : भाजपसोबत जुळलं नाही, शरद पवारही जवळ करेनात...; अजितदादांची राष्ट्रवादी पडली एकाकी

निवडणुकीचा हा पंधरा दिवसांचा कालावधी म्हणजे कार्यकर्त्यांचं कष्ट आणि त्या कष्टाबरोबर काहीजणांचा चंगळपणा हा ठरलेला असतो. शिवाय काही विशिष्ट वर्गातील लोक उमेदवारांच्या नाकी दम आणून 31 डिसेंबर साजरा करण्यासंदर्भात अन्य गोष्टींची मागणी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांच्या खिशाला कात्री यंदा 31 डिसेंबरला चांगलीच लागू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com