Balasaheb Patil News : सरकार सायबर सेलवर विशेष लक्ष ठेवू शकेल का ? बाळासाहेब पाटील यांचा सवाल..

Nagapur Winter Session : हॅकर्सने पैसै गायब होत आहेत, उपाययोजना करण्याची विशेष मागणी..
MLA Balasaheb Patil
MLA Balasaheb PatilSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Patil News : नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात माजी सहकारमंत्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी बॅंक व्यवहारात होणारे सायबर हल्ले याविषयी प्रश्न उपस्थित केला. राज्यामध्ये काही बँकामध्ये ऑनलाइन व्यवहार केले जातात, त्या बँकांवर विशेषतः हॅकर्स हल्ला करतात, त्या माध्यमातून रक्कम परदेशी पाठवली जाते, विशेष करून कोरोना काळात अशाप्रकारची प्रकरणे घडली असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

त्यामुळे राज्य सरकारचे सायबर सेलवर विशेष अस लक्ष ठेऊ शकेल का, किंवा तशा प्रकारची व्यवस्था भविष्यात करता येतील का? असा सवाल आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी उपस्थित केला. शुक्रवारी पार पडलेल्या कामकाजावेळी आमदार पाटील यांनी महत्वाची सायबर हल्ल्याविषयी विशेष मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagapur Winter Session) केली.

MLA Balasaheb Patil
Amol Shinde Family : "...नाहीतर मी आत्महत्या करेन!" ; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्या मुलाच्या वडिलांचा इशारा

यावर गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले, आपल्या सायबर (Cyber) सेलची कॅपसिटी वाढविण्याकरिता आपण महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे. हा जो प्रोजेक्ट आहे त्यातून आपण अशी एक प्लॅटफॉर्म तयार करतोय की यावर आपण सर्व बँक, फायनान्सियल इन्स्टिट्यूशनल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्वांचा वापर करतोय.

लवकर हा प्रश्न सुटण्याकरिता प्लॅटफाॅर्म तयार करत आहोत. जगातील प्रतिथयश 17 कंपन्याचा यामध्ये सहभाग असणार आहे. त्यामुळे सायबर सेलची डिटेक्शनची जी क्षमता आहे, ती प्रचंड प्रमाणात वाढेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

क्रेडिट कार्डचा फ्राॅड 3 ते 4 तासात रोखू शकलो तरच...

एखाद्या क्रेडिट कार्डचा फ्रॉड झाल्यास तो पैसा जर आपण तीन ते चार तासात रोखू शकलो. तरच तो पैसा रोखू शकतो.

अन्यथा खात्यातून ट्रान्स्फर होत विदेशात जातो. अलीकडच्या काळात अनेक लोक अशा प्रकारे नियोजन करतात कि ज्या देशाशी भारताचा समझोता नाही. अशा देशातील बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करतात. त्यामुळे क्विक रिस्पाॅन्सकरिता प्लॅटफाॅर्म तयार करत आहोत. 

सायबर हल्ल्यांनी बॅंक आणि ग्राहकही त्रस्त 

सायबर हल्ल्यांमुळे केवळ बॅंकाच नव्हे तर ग्राहकही त्रस्त झालेले पहायला मिळत आहेत. पुण्यातील एका मोठ्या बॅंकाच्या हल्ल्यात जवळपास 95 कोटीची रक्कम काढून घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामध्ये 11 जणांना अटकही करण्यात आली होती. परंतु, सामान्य लोकांच्या सेवानिवृत्ती, आयुष्यभराची कमावलेली कमाईही सायबर हल्ले करून लुटली जात आहे. या गुन्ह्यातील तक्रारी दररोज पोलिस ठाण्यात दाखल होत असून त्यांचा निपटारा लावण्याचे काम अगदीच नगण्य असल्याचे दिसत आहे.

(Edited by Amol Sutar)

MLA Balasaheb Patil
Assembly Winter Session : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे; आमदार धंगेकरांकडून थेट मुख्यमंत्रीच टार्गेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com