Ashok Kharat Case : अशोक खरात अन् महिलांच्या संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करत असाल तर खबरदार! तिघांविरोधात दाखल झालाय पहिला गुन्हा

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
Ashok Kharat real name controversy
Ashok Kharat real name controversySarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Case : विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची रोज नवी प्रकरणं समोर येत आहेत. या भोंदूबाबाने अनेक महिलांना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे. या शोषणाचे अनेक व्हिडीओही काही दिवसांपासून व्हायरल होतं आहेत. पण हेच व्हिडीओ व्हायरल करणे तिघांना अंगलट आले आहेत. महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमधील राहुल शिंदे, योगेश आढाव आणि बीडमधील संदीप गरजे या तीन व्यक्तींविरोधात अहिल्यानगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. बी. एन. एस. कलम २९४ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. या तीनही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत.

अधिक माहितीनुसार, यातील संशयित आरोपी राहुल शिंदे याला त्याचा मित्र योगेश आढावने तर योगेश आढाव याला बीड जिल्ह्यातील माजलगावमधील संदीप गरजे याने व्हिडिओ पाठवल्याचं पोलीस तपासात समोर आले होते. व्हिडिओ पाठवणाऱ्यांची ही साखळीच पोलिसांनी 'आरोपी' केली आहे. त्यामुळे तुम्हीही हे व्हिडीओ मागत असाल तर आताच सावध व्हा. अन्यथा महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तुम्हालाही तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

Ashok Kharat real name controversy
Ashok Kharat Case: खरातचा फास आवळण्यास सुरवात! चाकणकरही सदस्य असलेल्या ट्रस्टवर SIT ची मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांनीही दिला आदेश

भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीच्या माध्यमातून होत आहे. नाशिक पोलिसांकडे आतापर्यंत खरात विरोधात ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर वावी आणि सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी एक अशा १० गुन्हांचा एसआयटी तपास करणार आहे. त्यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरातशी संबंधित अनेक मालमत्ताही समोर येत आहेत. ज्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचं उघड होत आहे. त्यामुळे खरातशी संबंधित राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com