

SIT has sealed the bank account of Shivnika Trust: राज्यात गेल्या आठ दिवसापासून गल्लीपासून विधीमंडळापर्यंत भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कारनाम्यांची चर्चा आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या तपासाला आता वेग आला आहे. अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. खरातचा शस्र परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाचे माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर सदस्य असलेल्या शिवनिका ट्रस्टचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. शिवनिकाच्या आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू आहे. एसआयटीच्या तपास पथकाने मालमत्तेची माहिती मागवली आहे.
खरात यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी करण्यात येणार आहे. राज्य उपनिबंधक नोंदणी विभागाकडून खरात याच्या राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपासात कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यांच्या बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय तपास पथकाला आहे. या मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला? याची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशी वृत्त समोर येत असतानाच खरातता शस्र परवाना रद्द आल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक जिल्हा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. शस्त्र पोलीस ठाण्याच जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याला 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्र परवाना देण्यात आला होता. 1 जानेवारी 2024 रोजी शस्त्र परवानाचे नूतनीकरण करण्यात आले होते.
अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे तपासात उघड निष्पन्न झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.