Nashik: कुंभमेळा तोंडावर, 35 हजार कोटींची तरतूद... अजूनही नाशिकमध्ये खोदलेले रस्ते, वाहतूक कोंडी अन् अर्धवट विकासकामे

Nashik Kumbh Mela, Simhastha Kumbh, Godavari River: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद ध्वजस्तंभ शिलान्यासाने झाला. गोदावरी स्वच्छतेचा संकल्प, साधूग्राम भूमिपूजन आणि ३५ हजार कोटींच्या विकासकामांसह प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे.
Nashik Simhastha land expansion protest
Nashik Simhastha KumbhmelaSarkarnama
Published on
Updated on

Kumbhmela News: नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आगमनाचा शंखनाद झाला आहे. कुंभमेळा मंत्र्यांसह देशातील साधूंच्या उपस्थितीत त्याचा शिलान्यास झाला. त्यामुळे आता साधूंची आणि आखाड्यांची लगबग सुरू झाली आहे. रामकुंडावर गुरुवारी श्रीगंगा गोदावरी पंचकोटी (तीर्थ) पुरोहित संघाच्या पुढाकाराने कुंभमेळा ध्वज स्तंभाचा शिलान्यास झाला. यावेळी तिन्ही वैष्णव आखाड्यांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने पुन्हा एकदा गोदावरी स्वच्छतेचा संकल्प केला.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ज्ञानदास, महंत राजेंद्रदास (निर्मोही), महंत राम किशोरदास शास्त्री (दिगंबर), महंत वैष्णव दास (निर्वाणी) आणि नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त आणि जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Nashik Simhastha land expansion protest
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

कुंभमेळ्याच्या ध्वज स्तंभाचा शिलान्यास पुरोहित संघाच्या पुढाकाराने होतो. या निमित्ताने सिंहस्थ कुंभमेळ्याची अधिकृत घोषणा झाल्याचे संकेत असतात. काल त्याबाबतचे अधिकृत घोषणा झाली. यावेळी पुन्हा एकदा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गोदावरी स्वच्छतेचा संकल्प केला. गोदावरीची स्वच्छता आणि पर्यावरण याबाबत सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी प्रत्येकाने मनापासून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने पस्तीस हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे होणार आहेत. रस्ते, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, घाट आणि भाविकांसाठी प्राथमिक सुविधांचा त्यात समावेश आहे. मात्र यातील बहुतांशी कामे अद्याप प्राथमिक स्थितीत आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यापुर्वी ही कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासना पुढे आहे.

Nashik Simhastha land expansion protest
Pune News : प्रशासनापुढे सत्ताधारी आमदाराने हात टेकले : थेट उपोषणावर बसण्याची नामुष्की; सुनेत्रा पवारांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आलेल्या घोषणा आणि सुविधांची माहिती साधू आणि महंत यांच्या अपेक्षा वाढविणारी होती. साधूग्रामच्या निर्मितीसाठी प्राधान्य द्यावे अशी सूचना यावेळी साधूंनी केली. साधूग्रामच्या कामाचे भूमिपूजन देखील यावेळी प्रमुख महंतांच्या उपस्थितीत झाले.

यंदाच्या कुंभमेळ्याला गतवर्षीच्या कुंभमेळ्याच्या तुलनेत चारपट अधिक भाविक येतील अशी अपेक्षा आहे. बारा कोटी भाविक येणार असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी प्रत्येकाने करावी, या निमित्ताने अतिथी देवो भव: हा संदेश जगभर जाईल. त्यातून कुंभनगरी अर्थात नाशिक शहराची प्रतिष्ठा आणि प्रतिमा सुधारण्यास चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Nashik Simhastha land expansion protest
Maharashtra Politics Live Update : मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा

शहराच्या प्रत्येक भागात सध्या खोदलेले रस्ते आणि वाहतूक कोंडी अशी स्थिती आहे. बहुतांश विकास कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे कुंभमेळा सुरू होण्याच्या आधी ही कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. हे आव्हान प्रशासन पेलणार का? याची आता चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com