Gokul Politics : शिवाजी पाटलांच्या आरोपामुळे मुलगा-मुलीला चांगली स्थळं आली, अरुण डोंगळे म्हणतात, 'लाईन आपल्यापासून सुरु होते...'

Arun Dongle Vs shivajirao patil : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
gokul politics; Hasan Mushrif, Arun Dongle Vs shivajirao patil And Satej Patil
gokul politics; Hasan Mushrif, Arun Dongle Vs shivajirao patil And Satej Patil sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : माझी दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे, ज्यांनी हे आरोप केले आहेत. त्यांनी मला ती प्रॉपर्टी जाऊन दाखवावी. मी त्यांना ती दान करतो. त्यांनी जे आरोप केले. त्याबाबत मी कुठेही अब्रू नुकसानीचा दावा करणार नाही, मात्र आरोप करणाऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळे माझ्या मुलीला आणि मुलग्याला चांगली स्थळे येत आहेत, अशा शब्दात गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज ठराव दाखल करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

माझ्यावर आरोप भरपूर झाले. पण त्यात तथ्य काय आहे? हे पाहणे महत्त्वाचे आहे. लोकांची दिशाभूल करून गोंधळ निर्माण करणे हे काही लोकांचं कामं होतं. मात्र सभासदांचा, दूध उत्पदकांचा मिळवलेला विश्वास पाठीशी आहे.

त्यामुळे गोकुळशी निगडित सर्व घटक समाधानी आहे. आता राष्ट्रवादीचा वाटा मिळवण्याचं काम सेनापतीचे आहे, असे मंत्री मुश्रीफ यांना उद्देशून विधान केले. आम्ही मंत्री मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आहोत.

gokul politics; Hasan Mushrif, Arun Dongle Vs shivajirao patil And Satej Patil
Gokul Politics : गोकुळच्या राजकारणामुळे चढली पोलीस ठाण्याची पायरी; ठरावावरून सचिवाला मारहाण

महायुतीमध्ये आम्हाला जागा किती हव्या या मागणीचा अधिकार मला नाही, असे सांगत आमदार सतेज पाटील यांच्या बॅनरबाजीवर उत्तर दिलं आहे. तसं माझं नाव अरुण डोंगळे असून गोकुळमध्ये पुन्हा अरणोदय होणार. जिथं अरुण डोंगळे आहेत. तिथून लाईन सुरु होते, असा टोलाही लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com