

Gadhinglaj NCP Political Reaction News : गडहिंग्लज ‘राष्ट्रवादी व मुश्रीफमुक्त’ करण्याची भाषा करणारे आमदार शिवाजी पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ठाण्यात शोधावे लागेल, असा इशारा येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकातून दिला आहे. प्र. नगराध्यक्ष महेश सलवादे, बांधकाम सभापती गुंड्या पाटील, किरण कदम, नगरसेवक बसवराज खणगावे, अमर मांगले, उदय परीट, शबनम सय्यद, दीपक कुराडे, राहुल शिरकोळे आदींनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केल्याबद्दल आमदार पाटील यांचा निषेध नोंदवला आहे.
पत्रकात म्हटले आहे, ‘गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करण्याचे श्रेय आपल्याला मिळत नाही, या द्वेषापोटी आणि अस्वस्थे पोटीच शिवाजी पाटील यांनी विनाकारण मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करावा, ही सर्वपक्षीय मागणी होती. यात फक्त राष्ट्रवादी पक्षाचे शेतकरी नव्हते.
दिवाळीच्या काळात मुश्रीफ आंदोलनकर्त्यांसमोर आले. त्यांची भेट घेऊन त्यांनी दिवाळीनंतर होणाऱ्या दुष्काळी समितीच्या बैठकीत तालुका दुष्काळी जाहीर करणार, असे वचन दिले होते. त्याप्रमाणे दिवाळी झाल्यानंतर त्या बैठकीत मुश्रीफ यांनी सर्व शक्ती पणाला लावून गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर केला व त्याचा शासन निर्णयही करून घेतला.
हे श्रेय आपल्याला मिळत नाही, तीन चतुर्थांश तालुका आपला आणि एक चतुर्थांश तालुका मुश्रीफ यांचा, ही अस्वस्थता आमदार पाटील यांना सहन झालेली नाही. त्या अस्वस्थतेतून आणि नैराश्यातूनच त्यांनी ही बेछूट विधाने केली आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यातून ते सावरलेले नाहीत. गडहिंग्लजच्या आगामी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत जनता काही तो निकाल घेईलच. राष्ट्रवादी पक्षाचे १७ नगरसेवक सभागृहात आहेत. त्यामुळे जनता काय ठरवेल, तो कौल मान्य आहे.
आमदारांच्या अंतःकरणाला ठेच
गोकुळच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफ यांच्याकडे नेतृत्व देऊन जबाबदारी सोपवली. या निर्णयामुळे आमदारांच्या अंतःकरणाला ठेच लागली असेल. तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी पत्रक काढून या गोष्टीबाबत वाच्यता केली होती. ही गोष्टही मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकातून म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.