Gokul news : गोकुळमध्येही ‘विश्वास’घात? आबांना अस्तित्वासाठी दोनच पर्याय, ‘किंग’ असूनही ससेहोलपट होणार?

Gokul Politics Shock Vishwas Patil Faces Defeat : गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का. पक्षांतरानंतर आबांसमोर उरलेले दोन पर्याय कोणते? जाणून घ्या संपूर्ण राजकीय विश्लेषण.
Gokul Dairy
Gokul DairySarkarnama
Published on
Updated on

विधानसभा आणि कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उभा करणाऱ्या गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

अंतर्गत नरके गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वास पाटलांची न पटलेली भूमिका, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप या सर्वांचे परिणाम गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर उमटणार हे नक्की आहेत. त्यामध्ये आमदार नरके गट आणि महाडिक गटाचा झालेला समझोता हे गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे भावितव्य ठरवणारे आहे. सध्या विश्वास पाटील हे गोकुळ मधले किंग असले तरी महायुती किंवा पुन्हा सतेज पाटील ही भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे.

मागील दहा वर्षाच्या राजकारणात आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळच्या सभेत घुसून विचारलेला जाब आणि त्या नंतरच्या काळात सत्तेत असूनही शिरोली येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशिवाय गोकुळ अपूर्ण आहे असे निघालेले उद्गार हे गोकुळच्या या निवडणुकीत लढत स्पष्ट करते. शिवाय मागील पाच वर्षात गोकुळमधील सत्ता गमावून महाडिक गटावर नेमका काय परिणाम झाला. त्याचं प्रति याला कारणीभूत ठरलेले माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याबदल मनात असलेले सूड भावना याचे नेमके उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांची संभाषण क्लिप. याचे परिणाम गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर होणार आहेत.

विश्वास पाटील हे सध्या शिवसेनेत आहेत. महायुती सोबत म्हणून लढत असताना महाडिक गट त्यांना सोबत घेणार का? हे देखील पहावे लागणार आहे. गोकुळच्या मागील निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत विश्वास पाटील गेल्याने पंचवीस वर्षाच्या महाडिक गटाच्या गोकुळ मधील सत्तेला भगदाड पडले. याची सल आज ही महाडिक गटाच्या मनात आहे. त्याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आला. विश्वास पाटलांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पराभूत करण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा एक संभाषणाची क्लिप कारणीभूत ठरली.

Gokul Dairy
TOP 10 News : महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री राज्यसभेवर जाणार! गोकुळची निवडणूक होणारच, 'बिनविरोध'चा प्रस्ताव धुडकावला; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

गोकुळच्या निवडणुकीत करवीर, राधानगरी, भुदरगड हे तीन तालुके अति महत्त्वाचे आहेत. करवीर तालुक्यातून माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे गोकुळ मधील मातब्बर नेते असले तरी यावेळी मात्र त्यांना महायुती किंवा काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा पर्याय निवडावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटील यांची साथ सोडून विश्वास पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पाटील गटाची नाराजी विश्वास पाटलांच्यावर आहे. मात्र गोकुळच्या निवडणुकीत देखील विश्वास पाटलांची गरज सतेज पाटलांना तितकीच महत्वाची आहे. पण पुढील राजकीय बेरीज विश्वास पाटील यांचे भवितव्य महायुती सोबत राहायचं की सतेज पाटील यांच्याकडे परत जायचे हे ठरणार आहे.

दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर विश्वास पाटील हे आमदार नरके यांच्यासोबत शिवसेनेत गेले. विधानसभा निवडणूक आणि कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विश्वास पाटील हे आमदार नरके यांच्या विरोधात होते. हा विरोध नरके गटाचे कार्यकर्ते आजही विसरलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नरके गटाच्या कार्यकर्त्यांनी सचिन पाटील यांना मदत केलीच नाही अशी चर्चा दबक्या आवाजात पाटील गटात सुरू आहे.

Gokul Dairy
BJP Rajya Sabha Candidates : महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री राज्यसभेवर जाणार! भाजपच्या राहिलेल्या 3 जागांसाठी तावडेंसह दानवे, मुंडे, पाटील यांची नावे चर्चेत

शिवाय शिरोली येथे झालेल्या गोकुळच्या कार्यक्रमात आमदार चंद्रदीप नरके यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या बद्दल काढलेले उद्गार आतूनच नरके आणि महाडिक गटाचा समझोता सर्वांसमोर आलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जरी विश्वास पाटील शिवसेनेत आले असले तरी त्यांची अडचण झाली अशी परिस्थिती आहे. महायुती म्हणून राहुल पाटील, बाबासाहेब खाडे, अजित नरके हे तीन गट एकत्र येऊ शकतात. पण महायुतीमध्ये विश्वास पाटील आल्यास त्यांनाही या सर्वांना जमवून घ्यावे लागणार आहे. अन्यथा पुन्हा एकदा सतेज पाटील यांचीच पायरी विश्वास पाटलांना धरावी लागणार आहे. कारण करवीर तालुक्यातील शशिकांत पाटील चुयेकर त्यांच्याकडे सर्वाधिक ठराव आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com