Rohit Pawar News : मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नका ; रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Maratha reservation News : कुणबी समाजाचे दाखले देण्याबाबतचा निर्णय हा फक्त काही ठराविक जणांबाबत नसावा..
Eknath Shinde, Rohit Pawar
Eknath Shinde, Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nagar : "मराठा समाजाला आरक्षण मिळावे,' या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्येही मराठा समाजाकडून उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज (गुरुवारी) या उपोषणकर्त्यांची कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

"मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून केंद्र सरकारला मराठा आरक्षणाबाबतचा ठराव पाठवून द्यावा. केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनामध्ये हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो कायदा होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. कुणबी समाजाचे दाखले देण्याबाबतचा निर्णय हा फक्त काही ठराविक जणांबाबत नसावा, त्यामुळे इतरांचा प्रश्न तसाच प्रलंबित राहू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नयेत," असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

Eknath Shinde, Rohit Pawar
NCP MLA Threatened: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला टॅक्सी चालकाकडून धमकी

मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला चार दिवसाची मुदत देण्यात आली होती. सरकारने जरांगे पाटील यांच्याकडे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याप्रकरणी एक महिन्याची वेळ मागितली होती. परंतु, सरकारला आधीच तीन महिन्यांची मुदत देऊनसुद्धा त्यांच्याकडून कोणतीच पाऊले उचलण्यात न आल्याने त्यांनी येत्या चार दिवसांत योग्य तो निर्णय घ्यावा, असे मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले. आज (गुरुवार) मनोज जरांगे हे चर्चा करून आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Eknath Shinde, Rohit Pawar
Udhayanidhi Stalin News : स्टॅलिन यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट करणारे भाजप नेते अमित मालवीय अडचणीत ? गुन्हा दाखल

काल (बुधवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्यांच्याकडे महसुली, शैक्षणिक किंवा निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले दिले जाणार आहेत. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली आहे. न्यायाधीश संदीप शिंदे आणि इतर अधिकारी अशा पाच सदस्यांची समिती आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com