Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचा विधानसभेला पराभव अटळ; अंबादास दानवेंची भविष्यवाणी

Ambadas Danve Solapur Tour : अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक न लढविण्यासंदर्भात केलेले विधान हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. इतर मतदारसंघातील लोक त्यांना स्वीकारणार नाहीत, हे त्यांना कळून चुकलं आहे.
Ambadas Danve-Ajit Pawar
Ambadas Danve-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 August : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक न लढविण्यासंदर्भात केलेले विधान हे निवडणुकीतून लक्ष विचलित करण्यासाठीचा प्रयत्न आहे. मुळात इतर मतदारसंघातील लोक त्यांना स्वीकारणार नाहीत, हे त्यांना कळून चुकलं आहे. अजितदादा असतील किंवा छगन भुजबळ असतील त्यांच्या पक्षाचा पराभव विधानसभेत अटळ आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेच्या संघटनात्मक कामासाठी सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. माध्यमांशी बोलताना दानवे यांनी राज्य सरकार आणि अजित पवार यांच्या कालच्या विधानाचा समाचार घेतला.

सोलापूरचा (Solapur) दौरा हा शिवसेनेच्या (Shivsena) संघटनात्मक बांधणीसाठी आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा नसून शिवसेना बूथ नेमण्याचा हा दौरा आहे, असे दानवे यांनी प्रथमच स्पष्ट केले. रामगिरी महाराज विधानावर ते म्हणाले, रामगिरी महाराजांचे वक्तव्य मी ऐकले नाही. त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यावर मीदेखील बोललो आहे. मात्र, माझा उद्देश वेगळा होता.

Ambadas Danve-Ajit Pawar
Madha Assembly Constituency : अभिजीत पाटलांचे राजकीय सिबिल खराब; संजय कोकाटेंचा टोला

त्यावेळची सामाजिक आणि धार्मिक स्थिती काय होती, ते पाहावे. मुळात सर्वधर्माच्या इतिहासात अशा स्थिती येऊन गेली आहे. संतांनी समाजात एकोपा राहावा, असं बोलणे महत्त्वाचे आहे. जुन्या उकाळ्या पाकळ्या काढण्यात काही अर्थ नाही. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, असेही त्यांनी सांगितले.

विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होत नाहीत, खोटी आश्वासनं, पैसे देऊन मतं मिळतात, अशी भावना असलेले मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात शाश्वत विकास दिसत नाही, असा दावाही दानवे यांनी केला.

Ambadas Danve-Ajit Pawar
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे वरळी सोडणार, मुंबईतील सुरक्षित ‘या’ मतदारसंघावर डोळा; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

हिंदू आक्रोश मोर्चावरून दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. केंद्रात आणि राज्यात सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळे हिंदू आक्रोश हा सरकारकडे केला पाहिजे. धर्माच्या नावावर मत विभागणीचा हा प्रकार आहे. मात्र, लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही त्यांना लोक जागा दाखवतील, असा इशारा दानवे यांनी दिला.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com