NCP MLA Death Threat : विरोध केल्यास ‘खलास करू’, राष्ट्रवादीच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; एका पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

NCP MLA Idris Nayakwadi Receives Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांना पक्षातील काही स्थानिक नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून विरोध झाला होता. आता त्यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
NCP MLA Idris Naikwadi
NCP MLA Idris NaikwadiSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP MLA Idris Nayakwadi death threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याची घटना समोर आली आहे. ‘समान नागरी कायद्याला विरोध केल्यास तुम्हाला खलास करू,’ असा मजकूर या पत्रात असल्याची माहिती आहे. याप्रकरणी नायकवडी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इद्रिस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून त्यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे पत्र नेमके कोणी पाठवले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी नायकवडी यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला होता. पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आणि पक्षाच्या नेतृत्वाला विश्वासात न घेतल्याचा आरोप करत काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या घडामोडींमुळे सांगली जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते.

NCP MLA Idris Naikwadi
NCP MLA : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची आमदारकी जाणार? 6 महिन्यात फैसला होणार

सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते जमील बागवान आणि काही कार्यकर्त्यांनी नायकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, तसेच नायकवडी यांनी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले नसल्याचा आरोपही करण्यात आला होता.

याशिवाय, पक्षातील वरिष्ठ नेते किंवा मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांमार्फत (ओएसडी) त्यांना राजीनामा देण्याची सूचना करण्यात आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, नायकवडी यांनी हे दावे फेटाळून लावले होते. पक्षश्रेष्ठींनी आपला राजीनामा मागितलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला होता.

कोण आहेत इद्रिस नायकवडी?

इद्रिस नायकवडी हे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती झाल्याची माहिती आहे.

NCP MLA Idris Naikwadi
NCP MLA Supports : महायुती सरकारला घरच्याघरी धक्का! 230 आमदारांमध्ये फक्त एकाने घेतली अण्णा हजारे यांची बाजू

नायकवडी पुन्हा चर्चेत

अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली होती. आता धमकीचे पत्र मिळाल्याच्या घटनेनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. पत्रामागील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com