Abhijeet Patil Won : बबनदादांचे स्वप्न भंगले; माढ्यात अभिजीत पाटलांकडून रणजित शिंदेंचा दणदणीत पराभव

Madha Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व राखणाऱ्या शिंदे कुटुंबीयांस लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मोठा धक्का बसला आहे.
Abhijeet Patil-Ranjitsinh Shinde
Abhijeet Patil-Ranjitsinh ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 November : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह बबनराव शिंदे यांचा तब्बल 30 हजार 621 मतांनी दणदणीत पराभव केला. पाटील यांच्या विजयामुळे बननदादा शिंदेंचे मुलाला विधानसभेत पाठविण्याचे स्वप्न भंगले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना 1 लाख 36 हजार 559 मते मिळाली आहेत. अपक्ष निवडणूक लढविणारे रणजितसिंह बबनराव शिंदे यांना 1लाख 05 हजार 938 मते मिळाली आहेत. महायुतीच्या मीनल साठे या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. साठे यांना केवळ 13 हजार 381 मते मिळाली आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व राखणाऱ्या शिंदे कुटुंबीयांस लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मोठा धक्का बसला आहे. माढा लोकसभेतील महायुतीच्या पराभवानंतर बबनराव शिंदे यांनी महायुतीची साथ सोडत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोही शिंदे यांचा पराभव टाळू शकलेला नाही.

Abhijeet Patil-Ranjitsinh Shinde
Solapur Vidhansabha Election 2024 Result: राज्यात पिछाडीवर पडलेल्या महाआघाडीची सोलापुरात महायुतीला जोरदार टक्कर

आमदार बबनराव शिंदे यांनी मुलगा रणजित शिंदे यांना विधानसभेत पाठविण्यासाठी जंगजंग पछाडले. अनेकांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण केले. मात्र, मुलाला विधानसभेत पाठविण्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकलेले नाही.

Abhijeet Patil-Ranjitsinh Shinde
Mahesh sawant Won : मोठी बातमी! अमित ठाकरेंचा पराभव, महेश सावंत विजयी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com