Dr. Babasaheb Deshmukh : ‘काय डोंगार, काय झाडी’फेम शहाजीबापूंना गणपतआबांच्या नातवाने केले चितपट...

Sangola constituency Assembly Election 2024 Result : डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत यांनी निवडणुकीत एकत्र येत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय सांगोल्यातील निवडणुकीतील टर्निंग पॉईंट ठरला आहे. त्याचा परिणाम निकालातून दिसून आलेला आहे.
Dr. Babasaheb Deshmukh-ShahajiBapu Patil
Dr. Babasaheb Deshmukh-ShahajiBapu PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 November : सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांना (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तब्बल 25 हजार 386 मतांनी चितपट करत विजय मिळविला आहे. डॉ. बाबासाहेब यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पराभवाचे उठ्ठे काढले आहे. तांत्रिक कारणामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब लागला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

सांगोला विधानभा मतदारसंघात डॉ. बाबासाहेब देशमुख यांना (शेकाप) 1 लाख 16 हजार 256, तर त्यांचे निकटवर्तीय ॲड. शहाजीबापू पाटील (शिवसेना) यांना 90 हजार 870 मते पडली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांना 50 हजार 962 मते मिळाली आहेत. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा 25 हजार 386 मतांनी विजयी झाला आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

सोलापूर जिल्ह्यात सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना एकाकी निवडणूक लढवावी लागली हेाती. एकही मोठा नेता प्रचाराला आलेला नसतानाही दोन भावांनी मिळून सांगोल्याची निवडणूक एकहाती जिंकली आहे.

Dr. Babasaheb Deshmukh-ShahajiBapu Patil
Abhijeet Patil Won : बबनदादांचे स्वप्न भंगले; माढ्यात अभिजीत पाटलांकडून रणजित शिंदेंचा दणदणीत पराभव

डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत यांनी निवडणुकीत एकत्र येत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय सांगोल्यातील निवडणुकीतील टर्निंग पॉईंट ठरला आहे. त्याचा परिणाम निकालातून दिसून आलेला आहे.

मागील २०१९ च्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे हे एकत्र होते, त्यामुळे मागील निवडणुकीत शहाजी पाटील यांचा 768 मतांनी विजय झाला होता. आता मात्र शहाजीबापू आणि दीपक साळुंखे यांच्या मतांमध्ये विभागाणी झाली. त्याचा फायदा डॉ. बाबासाहेब देशमुख यांना झाल्याचे दिसून येत आहे.

Dr. Babasaheb Deshmukh-ShahajiBapu Patil
Solapur Vidhansabha Election 2024 Result: राज्यात पिछाडीवर पडलेल्या महाआघाडीची सोलापुरात महायुतीला जोरदार टक्कर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com