Satara ZP : राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपचा एक झेडपी सदस्य डांबून ठेवला होता : शिवेंद्रराजेंचा आरोप

Shivendraraje Bhosale Allegation : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देसाईंच्या आरोपांना उत्तर देत मुख्यमंत्री हस्तक्षेप नसल्याचे सांगितले. विरोधकांनी भाजप सदस्य डांबून ठेवल्याचा आरोप करत राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara, 22 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लोकशाहीचा खून केला, असा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता. त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. तसेच, या निवडप्रक्रियेत कोठेही मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही. उलट राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकांनी आमचा एक सदस्य डांबून ठेवला होता, त्यांचे नाव योग्य वेळी उघड करू, असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला.

सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) अध्यक्षपदी प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची बहुमताने निवड झाली. तत्पूर्वी मोठा राडा सातारा जिल्हा परिषदेत झाला, खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाईंशी पोलिसांची झटापट झाली होती. फोडाफोडीही झाली होती. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर आरोप केला हेाता. त्याला शिवेंद्रराजेंनी उत्तर दिले.

सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकशाही पाळून निवडी केल्या आहेत. या उलट पालकमंत्र्यांनी आकांडतांडव करत पोलिसांना वेठीस धरले होते, लोकशाहीचा खून केला म्हणणारे पदाधिकारी निवडीवेळी गेटच्या आत कशासाठी गेले होते, असा प्रश्नही शिवेंद्रसिंहराजेंनी केला.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे ३२ जिल्हा परिषद सदस्य स्वत: हून सभागृहात गेले होते. त्यांच्या मागे कोणीही पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी गेला नव्हता. या उलट त्यांच्या सदस्यांना त्यांनी दबावाखाली ठेवले होते. प्रत्येक वेळी भाजप अपयशी झाला की लोकशाही जिंकली आणि भाजप जिंकले की झुंडशाही झाली, अशी टीका होते.

Shivendraraje Bhosale
Satara ZP : गोरेंचा पलटवार : शंभूराज देसाईंनी जे पेरले, तेच उगवले; आम्ही बोललो तर फार गंभीर होईल, त्यावेळी ‘यशवंतविचार’ कुठे गेला होता?

साताऱ्यात भाजपचे २८ जिल्हा परिषद सदस्य होते. मित्रपक्षांचे मिळून ते ३३ सदस्य झाले. याउलट त्यांना त्यांचे सदस्य सांभाळता आले नाहीत. त्यात आमचा काय दोष. लोकशाहीचा खून वगैरे काही नाही. पालकमंत्र्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसून ते खोटे बोलत आहेत. त्यांना पोलिस आणि न्यायालयात जाण्यासाठी सर्व मार्ग खुले आहेत, असा सल्लाही शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिला.

पोलिस सभागृह परिसरात कारवाई करत असताना पालकमंत्र्यांनी आडवे पडायला नको होते. आमचा कोणताही दबाव पोलिसांवर नव्हता. उलट पालकमंत्री हे जिल्ह्याचे प्रमुख असल्याने त्यांचाच दबाव असेल. त्यांनी यापूर्वी गृहमंत्रिपद सांभाळलेले आहे, असा चिमटाही शिवेंद्रराजेंनी शंभूराज देसाईंना काढला.

Shivendraraje Bhosale
Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत लोकशाहीच्या चिंधड्या : गलिच्छ राजकारणाला जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि SP तुषार दोशींची उघड साथ

ते म्हणाले, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांनी कुठेही हस्तक्षेप केला नाही. या उलट राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकांनी आमचा एक सदस्य डांबून ठेवला होता, त्यांचे नाव योग्य वेळी उघड करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com