
Solapur, 02 May : सोलापूरच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून गेली दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात दुपारच्या वेळी तर संचार बंदीसारखी परिस्थिती दिसून येत आहे. पारा वाढल्याने आगीच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत दोन बसाला आग लागल्याची घटना घडल्या आहेत. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाच्या स्कॉर्पिओ गाडीने आज अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून गाडी तातडीने पेट्रोल पंपाच्या बाहेर आणली आणि मोठ्या चपळाईने गाडीतून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांचे चिरंजीव जीवन जानकर हे आज काही कामानिमित्त पासपोर्ट कार्यालयात आले होते. काम झाल्यानंतर ते परत माळशिरसला जात असताना सोलापूर शहरापासून चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव तांडा येथील पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी गाडी उभी केली.
पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गाडी उभी करताच गाडीतून धूर निघत असल्याचे तेथील कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी जीवन जानकर यांना सांगून गाडी पंपाबाहेर घेण्यास सांगितले. जानकर यांनी तातडीने गाडी सुरू पंपाच्या बाहेर आणली. पंपातून बाहेर येताच गाडीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून जीवन जानकर (jeevan Jankar) हे गाडीतून तातडीने खाली उतरले, त्यामुळे ते सुरक्षित आहेत.
दुपारची वेळ असल्याने उष्णताही मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचे लोटच्या लोट दिसत होते. सोलापूर (Solapur) महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला तातडीने पाचारण करण्यात आले. तोपर्यंत गाडी बऱ्यापैकी जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवावांनी आग ओटाक्यात आणली पण तोपर्यंत गाडी आतून खाक झाली होती.
धूर निघत असतानाही जीवन जानकर यांनी मोठ्या मुश्किलीने गाडी पंपाच्या बाहेर काढली. गाडीला पंपावरच आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. अत्यंत ज्वलनशील असलेले पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या जवळ होत्या, त्यामुळे जानकर यांनी अवघ्या काही सेकंदात गाडी पंपाच्या बाहेर काढली, त्यामुळे दुर्घना टळली, असेच म्हणावे लागेल.
सोलापुरात वाहनांना आगी
दरम्यान, सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ठराविक दिवसांनंतर वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बोरामणी नाक्याजवळ सीटी बस पेटली होती. तर काही दिवसांपूर्वी एसटी बसलाही मंद्रूप टोलनाक्याजवळ आग लागली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.