

Pandharpur, 01 October : दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी (ता.1 ऑक्टोबर) मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेणे, ही कौतुकास्पद बाब आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी सरकारसोबतच समाजातील विविध घटकांनीही पुढे येणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्याचे कौतुक केले.
परीक्षा फी नव्हे; तर संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी : सुनेत्रा पवारांना पत्र
सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी आज शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना केवळ परीक्षा फी माफी पुरेशी ठरणार नाही, तर संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी, अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी मांडली.
यासंदर्भात श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन दिले आहे. ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करण्यात यावी.
शेतकऱ्यांच्या मुलाच्या हातात पुस्तक आले, तर त्या कुटुंबाच्या भविष्यात आशेचा किरण निर्माण होतो. पैशाअभावी कोणत्याही शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण थांबू नये, यासाठी सरकारने हा निर्णय घ्यावा. बळीराजांच्या लेकरांच्या भवितव्याला नवी दिशा देणारा हा निर्णय ठरेल, असेही शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.
सरकारच्या संवेदनशील निर्णयाबद्दल आभार मानत, या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.