Satara Dcc Bank Election : साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; दोन बडे नेते जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून आऊट, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Anil Desai and Rajendra Rajpure News : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि राजेंद्र राजपुरे यांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले. सलग दहा वर्षे संचालक राहिल्यामुळे दोघांना निवडणूक लढविता येणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Anil Desai and Rajendra Rajpure
Anil Desai and Rajendra RajpureSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 17 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई आणि राजेंद्र राजपुरे यांना कोल्हापूर सर्किट बेंचनंतर सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा बॅंकेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. हे दोघेही सातारा जिल्हा बॅंकेत सलग १० वर्षे संचालक राहिलेले आहेत, त्याच मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही जिल्हा बॅंकेची निवडणूक लढविता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. अनिल देसाई हे जिल्हा सहकारी बॅंकेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.

दरम्यान, राजेंद्र राजपुरे आणि त्यांच्या पत्नी रुपाली राजपुरे या दोघांनाही निवडणूक लढविण्यास कोल्हापूर सर्किट बेंचने अपात्र ठरविले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने रुपाली राजपुरे यांना दिलासा देताना महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून भरलेले अर्ज वैध ठरविला आहे, त्यामुळे संजय मोरे यांचे महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध होण्याचे स्वप्न भंगले आहे.

सातारा जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत रिझर्व्ह बॅंकेच्या अधिनियमानुसार सलग १० वर्षे संंचालक राहिलेल्या संचालकांना यावेळी निवडणूक लढविता येणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, याबाबत औद्योगिक, विणकर व मजूर संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देसाई तसेच महाबळेश्वर सोसायटीतून अर्ज भरलेले राजेंद्र राजपुरे यांच्या अर्जाविरोधात चंद्रकांत कोकाटे व संजय मोरे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

Anil Desai and Rajendra Rajpure
Mangalvedha Politic's : मंगळवेढ्यात ‘तीर्थक्षेत्र’मध्ये फाटाफूट : DCCचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षांसह नगरसेवक भाजपत प्रवेश करणार

या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी दोघांनाही या वेळेस निवडणूक लढता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्या निर्णयाविरोधात अनिल देसाई व राजेंद्र राजपुरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोय माल्य बागची यांनी दोघांचीही याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे देसाई आणि राजपुरे यांना यावेळी निवडणूक लढता येणार नाही, त्यामुळे यावेळी या दोघांचे बॅंकेच्या निवडणुकीतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Anil Desai and Rajendra Rajpure
Satara Dcc Bank : उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे, नितीन पाटील आऊट?; तर निंबाळकर, वीर, धुमाळ, मोरेंना लागणार लॉटरी...

संजय मोरेंचे स्वप्न भंगले

दरम्यान, महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या रूपाली राजपुरे यांचाही अर्ज उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरविला होता. या विरोधात त्यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत रूपाली राजपुरे यांचा अर्ज वैध ठरवत दिलासा दिला, त्यामुळे येथील दुसरे उमेदवार संजय मोरे यांचे जिल्हा बॅंकेचे बिनविरोधचे स्वप्न अपुरे राहिले आहे. त्यांच्या विरोधात रूपाली राजपुरे निवडणूक रिंगणात असून, ही लढत आता चुरशीची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com