Whip Issue : शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटातील आमदारांना लागू होणार का? विधीमंडळाचे निवृत्त सचिव कळसे म्हणाले...

निवडणूक आयोगाने हे दोन्ही गट स्वतंत्र असल्याचे मान्य केले आहे.
Anant Kalse-Uddhav Thackeray-Eknath Shinde
Anant Kalse-Uddhav Thackeray-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी व्हीप बजावून बैठक बोलावून त्यात ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील १५ आमदारांना अडकविण्याचा डाव शिंदे गटाकडून (Eknath Shinde) आखला जात आहे. तसे स्पष्ट संकेत शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले आहेत. मात्र, शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटातील आमदारांना लागू होऊ शकतो की नाही, याचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात, असे विधीमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे (Anant Kalse) यांनी स्पष्ट केले. (Will Shinde group's whip apply to Thackeray group MLAs? Retired Legislative Assembly Secretary Anant Kalse said...)

येत्या २७ फेब्रुवारीपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी व्हीप बजावून बैठक बोलवणार असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. शिंदे गटाच्या बैठकीला ठाकरे गटाचे १५ आमदार उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार शिंदे गटाकडून सध्या सुरू आहे. त्याबाबत निवृत्त सचिव कळसे बोलत होते.

Anant Kalse-Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray : शिवसेना हातची निसटल्यानंतर ठाकरेंनी उचलले मोठे पाऊल : आगामी रणनीतीबाबत मातोश्रीवर खलबतं

येत्या अधिवेशनात आदित्य ठाकरे यांच्यासह या सर्व १५ आमदारांना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप पाळावा लागणार आहे. तसेच, सरकारने मांडलेल्या विधेयकांवर त्यांच्या बाजूने मतदान करावे लागणार आहे. ठाकरे गटाने आदेश पाळला नाही, तर आदित्य यांच्यासह उर्वरीत १५ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा इशारा केसरकर यांनी दिला.

Anant Kalse-Uddhav Thackeray-Eknath Shinde
Thackeray-Shinde CM Post :उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव सुचविले होते : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

यासंदर्भात कळसे म्हणाले की, उद्धव ठाकरे गटातील आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप लागू होऊ शकतो की नाही, हे विधानसभेचे अध्यक्षच ठरवतील. विधानसभा अध्यक्षांनी कारवाईस मान्यता दिली, तर ठाकरे गट न्यायालयात दाद मागू शकतो.

Anant Kalse-Uddhav Thackeray-Eknath Shinde
NCP News : राष्ट्रवादीचा बडा नेता घेणार अमित शहांची भेट

यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी मात्र निवडणूक आयोगाने हे दोन्ही गट स्वतंत्र असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटाला लागू होऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

Anant Kalse-Uddhav Thackeray-Eknath Shinde
Maharashtra Politics : निष्ठावंत शिवसैनिकाचे एकनाथ शिंदेंना चॅलेंज : गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही मरणार नाही

खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेनेवर दावा कोणाचा, यावर अद्यापही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी जोपर्यंत याबाबतची सुनावणी पूर्ण होऊन निकाल दिला जात नाही, तोपर्यंत ठाकरे गट आणि शिंदे गट परस्परांना व्हीप बजावू शकत नाहीत.

Anant Kalse-Uddhav Thackeray-Eknath Shinde
Ambegaon News : आंबेगावात आता विकासासाठी डबल इंजिन : वळसे पाटलांच्या कोटीला आढळरावांची हसून दाद

'आम्ही फक्त ठाकरेंचा व्हीप मानतो'

आम्ही केवळ ठाकरे नावाने दिलेलाच व्हीप मानतो. शिवसैनिक आणि मतदार कधीच चिन्हाबरोबर नसतो. पक्षाच्या नेतृत्वाबरोबर असतात. शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आहेत. हिंदुत्ववादी, मराठी विचारांचा मतदार ठाकरेंबरोबर आहे, चिन्हाबरोबर नाही, असे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com